शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

पिकांची नासाडी करणाऱ्यांनी जातीवाचक शिवीगाळ करत शेतकऱ्याचे फायटरने दात पाडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 17:32 IST

Crime News In Beed दोघांवर ॲट्राॅसिटीसह मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे

ठळक मुद्देअंबाजोगाई तालुक्यातील बर्दापूर येथील घटना

अंबाजोगाई : शेतातील तुरीचे नुकसान करण्यापासून रोखणाऱ्या शेतकऱ्याला दोघा जणांनी जातीवाचक शिवीगाळ बेदम मारहाण करून जबर जखमी केले. ही घटना अंबाजोगाई तालुक्यातील बर्दापूर येथे गुरुवारी सायंकाळी घडली. शेतकऱ्याच्या फिर्यादीवरून दोघांवर ॲट्राॅसिटीसह मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला.  कचरु वामन जोगदंड वामन जोगदंड यांची बर्दापूर शिवारात दोन एकर शेती आहे. त्यांच्या शेजारी गणेश साधू जोगदंड यांची शेती आहे. त्या शेतातील एक प्लॉट वाहेद सय्यद यांना विक्री केला आहे. गुरुवारी (दि.१०) सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास सोन्या वाहेद सय्यद आणि मोहसीन मुसा उर्फ लखन शेख हे दोघे त्या प्लॉटवर आले आणि मुरुमाचा ढिगारा पांगवू लागले. त्यामुळे शेतातील तुरीचे नुकसान होत असल्याने कचरू जोगदंड यांनी त्या दोघांना पिकाचे नुकसान करू नका अशी विनंती केली. 

त्यावर त्या दोघांनी कचरू यांना जातीवाचक शिवीगाळ करत तुला जमीन काय करायची असे दटावले आणि फायटरने वार करून त्यांचे दोन दात पाडले. त्यानंतरही त्यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यात आली अशी फिर्याद कचरू जोगदंड यांनी दिली आहे. सदर फिर्यादीवरून दोन्ही आरोपींवर बर्दापूर पोलीस ठाण्यात ॲट्राॅसिटीसह मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील जायभाये करत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBeedबीडFarmerशेतकरी