शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

Crime News: न विचारता माहेरी गेल्याने पत्नीचा खून; पतीस जन्मठेप

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2023 08:23 IST

Crime News: न विचारता माहेरी का आलीस, असे कारण काढून सासुरवाडीत येऊन   चाकूने भोसकून पत्नीची हत्या केल्याची घटना दोन वर्षांपूर्वी बोरखेड (ता. बीड) येथे घडली होती.

बीड : न विचारता माहेरी का आलीस, असे कारण काढून सासुरवाडीत येऊन   चाकूने भोसकून पत्नीची हत्या केल्याची घटना दोन वर्षांपूर्वी बोरखेड (ता. बीड) येथे घडली होती. या प्रकरणात अपर सत्र न्या. सुरेखा पाटील यांनी आरोपी पतीला दोषी ठरवून जन्मठेप व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा ३० जानेवारी रोजी ठोठावली.शहाजी शहात्तर काळे (३२,रा. हंगेवाडी, जि. उस्मानाबाद) असे आरोपीचे नाव आहे. पत्नी नगिना (२५) हिच्या हत्येचा त्याच्यावर आरोप होता. नगिना हिचे माहेर बोरखेड (ता. बीड) आहे. पतीशी भांडण झाल्याने नगिना ही ८ ऑक्टोबर २०२० रोजी माहेरी निघून आली होती. त्यानंतर १० ऑक्टोबर २०२० रोजी शहाजी हा सासुरवाडीत गेला आणि त्याने चाकूने नगिनावर  सपासप वार केले.  नगिनाच्या आईच्या फिर्यादीवरून नेकनूर ठाण्यात पती शहाजी काळेविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंद झाला. तत्कालीन सहायक निरीक्षक लक्ष्मण केंद्रे व उपनिरीक्षक किशोर काळे यांनी तपास करून मुदतीत दोषारोपपत्र दाखल केले. सरकारी वकील अनिल धसे यांचा युक्तिवाद, साक्षीपुरावे ग्राह्य धरून न्या. सुरेखा पाटील यांनी आरोपी शहाजी काळेला दोषी ठरवून दहा हजार दंड व जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.

टॅग्स :Courtन्यायालयBeedबीड