शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

नावे गुन्हा तरी कंबरेला घोडा; बीड जिल्ह्यातील बंदुकीचे १०० परवाने रद्द 

By सोमनाथ खताळ | Updated: January 8, 2025 12:05 IST

पहिल्यांदाच एवढी मोठी कारवाई झाल्याने खळबळ उडाली आहे.

बीड : एक-दोन नव्हे, तर तब्बल १६ गुन्हे दाखल असणाऱ्या गुन्हेगाराच्या कंबरेलाही परवानाधारक बंदूक होती. परंतु, हाच प्रकार 'लोकमत'ने चव्हाट्यावर आणला. त्यानंतर पोलिसांनी पत्र पाठविले. यामध्ये मंगळवारी तब्बल १०० परवाने निलंबित आणि रद्द करण्यात आले आहेत. पहिल्यांदाच एवढी मोठी कारवाई झाल्याने खळबळ उडाली आहे. मस्साजोग सरपंच हत्या प्रकरणाने जिल्ह्यातील वातावरण ढवळून निघाले, त्यानंतर लोकप्रतिनिधींनी आवाज उठवला. अखेर जिल्हाधिकाऱ्यांनी शस्त्र परवाना रद्दच्या कारवाईला वेग दिला आहे.

जिल्ह्यात एक हजार २८१ जणांकडे शस्त्र परवाना आहे. प्रत्येक परवाना देताना पोलिसांकडून संबंधित अर्जदाराची शहानिशा केली होते. त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का, याची माहिती घेतली जाते; परंतु मागील काही वर्षांत पोलिसांनी याकडे सपशेल दुर्लक्ष केले. त्यामुळेच राजकीय हस्तक्षेप आणि प्रशासनाच्या संगनमताने अगदी चने, फुटाण्याप्रमाणे परवाने देण्यात आले. हा आकडा पाहिल्यानंतर तत्कालीन पोलिस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी गुन्हे दाखल असलेल्या सर्वांची यादी बनवली. गुन्हे दाखल असलेल्या २४५ व्यक्तींची माहिती घेऊन त्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवला. त्यानंतर यात छाननी केल्यावर २३२ जणांना नोटीस देऊन सुनावणीसाठी बोलावले. खुलासा असमाधानकारक असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी मंगळवारपर्यंत १०० प्रस्ताव रद्द केले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत पहिल्यांदाच एवढी मोठी कारवाई झाल्याने खळबळ उडाली आहे.

अधिवेशनातही गाजला मुद्दा६ डिसेंबर २०२३ रोजी 'लोकमत'ने सर्वांत अगोदर 'चोरच झाले शिरजोर, गुन्हेगारांच्या कंबरेलाच परवानाधारक पिस्टल' असे वृत्त प्रकाशित केले होते. त्यानंतर नागपूर येथे १६ ते २१ डिसेंबर हिवाळी अधिवेशन झाले. यात भाजपचे आष्टीचे आ. सुरेश धस यांनी शस्त्र परवान्याचा विषय उपस्थित केला. सत्ताधारी, विरोधी आमदारांसह अंजली दमानिया यांनीही हा मुद्दा लावून धरला. त्यानंतर आता परवाना रद्दच्या कारवाया सुरू झाल्या आहेत.

परळीत हवेत गोळीबार, त्यांची बंदूक काढलीपरळीत कैलास बाबासाहेब फड, माणिक मुंडे आणि जयप्रकाश सोनवणे यांनी हवेत गोळीबार केला होता. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले. तसेच या तिघांचाही परवाना आता रद्द झाला आहे.

३०३ प्रस्ताव नाकारलेजिल्हाधिकारी यांच्याकडे प्रस्ताव पाठविण्याआधी पोलिसांकडून त्याची खातरजमा केली होती. हे सर्व करून २०२४ या वर्षात पाठविलेले ३०३ प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयातून नाकारण्यात आले आहेत.

२३२ प्रस्तावांवर होणार निर्णयतत्कालीन अधीक्षक अविनाश बारगळ यांनी २४५ प्रस्ताव पाठविले होते. त्यात छाननी होऊन २३२ राहिले. त्यापैकी १०० प्रस्ताव मंगळवारी निलंबित व रद्द करण्यात आले. उर्वरित १३२ प्रस्तावांवरही कारवाई सुरूच आहे.

अशी आहे आकडेवारीएकूण शस्त्र परवाने - १२८१रद्दचे प्रस्ताव पाठविले - २४५छाननीत वगळले - १३

गुन्हे दाखल असतानाही परवाना१ गुन्हा असलेले - १५५२ गुन्हे असलेले ४०३ गुन्हे असलेले २०४ गुन्हे असलेले १७५ गुन्हे असलेले ३६ गुन्हे असलेले ५९ गुन्हे असलेला ११० गुन्हे असलेला ११२ गुन्हे असलेला ११४ गुन्हे असलेला ११६ गुन्हे असलेला १

टॅग्स :BeedबीडCrime Newsगुन्हेगारीbeed sarpanch murder caseबीड सरपंच हत्या प्रकरण