शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

जवानावर अत्याचाराचा गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2019 00:11 IST

लग्नाचे आमिष दाखवून एका तरूणीवर अत्याचार करणाऱ्या जवानाविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देबीडमधील प्रकार : लग्नाचे आमिष दाखवून पीडितेवर दोन वर्षे अत्याचार; १० जून रोजी त्याचे होणार होते दुसरे लग्न

बीड : लग्नाचे आमिष दाखवून एका तरूणीवर अत्याचार करणाऱ्या जवानाविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या जवानाने सलग दोन वर्षे तरूणीवर अत्याचार केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. बीड शहरातील संत नामदेव नगर भागात ही घटना घडली.प्रदीप राजाभाऊ मुंडे (२७, रा. वडवणी) असे संशयित आरोपीचे नाव आहे. संत नामदेव नगर भागात राहणारी पीडित २० वर्षीय तरुणीचे वडवणी येथे नातेवाईक राहतात. त्यामुळे ती नेहमीच वडवणी येथे जात होती. दोन वर्षांपूर्वी ती अशीच एकदा कार्यक्रमासाठी नातेवाईकांकडे गेली होती. याचवेळी तिची याच गल्लीत राहणा-या प्रदीप मुंडे सोबत ओळख झाली. ओळखीतून त्यांची मैत्री आणि मैत्रीनंतर प्रेम झाले. प्रदीप सुट्टीवर आल्यास ते नेहमीच वेगवेगळ्या ठिकाणी भेटत होते. अनेकवेळा तरूणीच्या घरीही प्रदीप राहिला. हा सर्व प्रकार तरूणीच्या आईलाही माहिती होता. मात्र तो तिच्याशी लग्न करणार असल्याने तिनेही त्यांना अडविले नाही. प्रदीप हा सुट्टीवर आला की या तरूणीसोबत रहात असे.दरम्यान, २८ एप्रिल २०१९ रोजी प्रदीप हा बीडला आला. वडवणीला जाण्याऐवजी तो पीडितेच्या बीडमधील घरी राहिला. यावेळी त्याने तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर तो पुन्हा कर्तव्यावर गेला. दरम्यानच्या काळात त्याचे एका मुलीसोबत लग्न जुळले. १० जून रोजी त्यांच्या विवाहाची तारीखही निश्चित झाली होती. हाच प्रकार पीडितेला मैत्रीणीमार्फत समजला. तिला हे सर्व असह्य झाले.आपल्याला धोका झाल्याचे समजताच प्रदीप येण्याच्या दिवशी ती बीड बसस्थानकात जावून बसली. सायंकाळी सहाच्या सुमारास प्रदीप बसमधून उतरताच तिने त्याला शिवाजीनगर पोलीस ठाण्यात नेले. दोन दिवस त्यांची इथे चौकशी चालली. दोघांनीही आपण लग्न करणार असल्याचा जबाब दिल्याने त्यांना नातेवाईकांच्या स्वाधीन केले. मात्र, नंतर त्याने लग्नास नकार दिल्याने पीडिता सोमवारी सकाळीच ठाण्यात गेली आणि प्रदीपविरोधात अत्याचाराची फिर्याद दिली. त्यावरून अत्याचार व अ‍ॅट्रॉसिटी कायद्यान्वये शिवाजीनगर ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. तपास उपअधीक्षक भास्कर सावंत करत आहेत.लग्नादिवशीच पीडित तरुणी ठाण्यातआठवड्यापूर्वी दोघांनीही आपण लग्न करणार असल्याचा जबाब दिल्याने पोलिसांनी त्यांना सोडले. मात्र प्रदीप नंतर बदलला. त्याने लग्नास नकार दिला. सोमवारी त्याच्या लग्नाची तारीख होती.याच दिवशी पीडिता ठाण्यात पोहचली आणि त्याच्याविरोधात फिर्याद दिली. दरम्यान, आठवड्यापूर्वीच नियोजीत वधूला हा सर्व प्रकार समजला होता.त्यामुळे त्यांनी या लग्नास नकार दिला होता. सध्या प्रदीप फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

टॅग्स :BeedबीडSoldierसैनिकCrime Newsगुन्हेगारी