शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

बुरुजांना तडे, भिंतीना भेगा; निधीअभावी ऐतिहासिक धारूर किल्ला मागील बाजूने होईल भुईसपाट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2023 19:41 IST

संतापजनक! ऐतिहासिक धारूरच्या किल्ल्याच्या भिंतीला भेगा; समोरून चकाकी, पाठीमागून हानी

- अनिल महाजनधारूर : शहराचे वैभव असणारा येथील ऐतिहासिक किल्ला पुरातत्त्व विभागाने संरक्षित स्मारक म्हणून जाहीर केला. यानंतर पाच वर्षांपूर्वी सात कोटी रुपये खर्च करून किल्ल्याचा समोरील भाग चकाचक केला. मात्र, पुढील निधी येणे बंद झाल्याने सध्या मागील बाजूने हा किल्ला भुईसपाट होण्याच्या मार्गावर आहे. किल्ल्यातील अनेक बुरुजांना तडे गेल्याचे दिसत आहे. यामुळे इतिहासप्रेमींमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

धारूर शहर व या परिसराच्या वैभवात भर टाकण्याचे काम येथील ऐतिहासिक किल्ला करतो. १५६८ च्या काळात आदिलशाहचा सरदार किश्वरखान लारी याने बांधलेला हा किल्ला आजही शाबूत व बऱ्याच बाबतीत चांगल्या स्थितीत आहे. पुरातत्त्व विभागाने अनेक वर्षांच्या मागणीनंतर या किल्ल्याला संरक्षित स्मारक म्हणून जाहीर केल्यावर पाच वर्षांपूर्वी दोन टप्प्यांमध्ये या किल्ल्यास ७ कोटी रुपयांचा निधी दिला. या निधीतून किल्ल्याच्या समोरील भागाची डागडुजी करण्यात आली. यामुळे किल्ल्याची शोभा वाढली व किल्ल्यात येणाऱ्या पर्यटकांची संख्याही वाढली. पर्यटकांची ये-जा वाढल्यानंतर सुरुवातीस या किल्ल्याला खासगी संस्थेमार्फत सुरक्षा गार्डही नेमण्यात आले होते. त्यामुळे किल्ल्याची सुरक्षितता जपली जात होती. मात्र, दोन वर्षांपासून सुरक्षा गार्ड नसल्याने हा किल्ला म्हणजे आओ जाओ घर तुम्हारा.. झाला आहे. या किल्ल्याच्या दुरुस्तीसाठी पुढील निधी न आल्याने किल्ल्याचा मागील भाग व किल्ल्यातील महत्त्वाचे भाग भुईसपाट होण्याच्या मार्गावर आहेत. किल्ल्याच्या खाऱ्या पाण्याच्या साठ्याकडील अनेक बुरुजांच्या भिंतींना गेलेल्या मोठमोठ्या तड्यांमुळे हे बुरुजही येणाऱ्या काळात भुईसपाट होण्याची भीती निर्माण झाली आहे. पुरातत्त्व विभागही याकडे लक्ष देण्यास तयार नाही. पुढील बाजूने चकाचक दिसणारा किल्ला मागील बाजूने मात्र भुईसपाट होत असल्याने इतिहासप्रेमी दुःख व्यक्त करीत आहेत. पुढील निधी मिळत नसल्याने या प्रश्नी शासनाला जाग केव्हा येणार? असाही प्रश्न दुर्गप्रेमी विचारत आहेत.

वरिष्ठांच्या सूचनेनुसार पाठपुरावा सुरूधारूर किल्ल्यातील पुढच्या कामासाठी आमचा पाठपुरावा सुरू आहे. सीएसआर फंडातून एखादी संस्था सुरक्षा रक्षक नेमत असेल तर त्यादृष्टीनेही प्रयत्न करीत आहोत. अत्यावश्यक कामाची पाहणी करून वरिष्ठ कार्यालयास आपण अहवाल नक्की पाठवू, असे पुरातत्त्व विभागाचे सहायक संचालक अनिल गोटे यांनी सांगितले.

किल्ल्याचे ऐतिहासिक वैभव जपावेधारूर येथील किल्ल्यात ७ कोटी रुपयांचे काम झाल्याने दर्शनीय भाग चांगला झाला. मात्र, पुढील निधी येत नसल्याने पाठीमागील बाजूने किल्ल्यास धोका निर्माण झाला आहे. पुढील काम तत्काळ होणे आवश्यक आहे. किल्ल्याच्या सुरक्षिततेसाठी पहारेकरी कायमस्वरूपी नियुक्त करून किल्ल्याचे ऐतिहासिक वैभव जपणे आवश्यक आहे, असे अभ्यासक सय्यद शाकेर यांनी सांगितले.

टॅग्स :BeedबीडFortगडArchaeological Survey of Indiaभारतीय पुरातत्व सर्वेक्षण