शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

ठोंबरे दाम्पत्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यास न्यायालयाची स्थगिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2019 14:26 IST

ठोंबरे यांनी अंबाजोगाई येथील जिल्हा सत्र न्यायालयात दाद मागितली होती.  

ठळक मुद्देअंबाजोगाई येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने १० आॅक्टोबरपर्यंत स्थगिती दिली.

केज (जि. बीड) : लोकनेते गोपीनाथराव मुंडे सहकारी सूतगिरणीचे संस्थापक अध्यक्ष आ. प्रा. संगीता ठोंबरे व चेअरमन डॉ. विजयप्रकाश ठोंबरे यांच्याविरु द्ध केज न्यायालयाने विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्याच्या दिलेल्या आदेशास अंबाजोगाई येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने १० आॅक्टोबरपर्यंत स्थगिती दिली.  

केज येथील लोकनेते गोपीनाथराव मुंडे सहकारी सूतिगरणीचे कथित संचालक गणपती कांबळे यांनी सूत गिरणीच्या संस्थापक अध्यक्षा आ. प्रा. संगीता ठोंबरे व चेअरमन विजयप्रकाश ठोंबरे यांच्यावर १५६(३) सीआरपीसी नुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी केज न्यायालयात केली होती.  आपल्या खोट्या स्वाक्षऱ्या करून शासनाची व जनतेची फसवणूक केल्याचे  नमूद करुन पुराव्यादाखल त्यांनी अश्विनी पवार फॉरेन्सिक तज्ज्ञाचा अहवाल व शपथ पत्र जोडले होते. या याचिकेवर ११ सप्टेंबर रोजी सुनावणीनंतर चेअरमन विजय प्रकाश ठोंबरे व आ. संगीता ठोंबरे यांच्या विरोधात कलम ४२०,४६७, ४६८, ४७१   अन्वये गुन्हे दाखल करण्याचे आदेश केज प्रथम वर्ग न्या. थोरात यांनी दिले होते. 

या आदेशाच्या नाराजीने ठोंबरे यांनी अंबाजोगाई येथील जिल्हा सत्र न्यायालयात दाद मागितली होती.  जिल्हा व अतिरिक्त सत्र न्या.एस. एस. सापत्नेकर यांच्या न्यायालयात बुधवारी सुनावणी झाली. ठोंबरे यांच्या वतीने अ‍ॅड. जे. व्ही. गाडे यांनी बाजू मांडली. त्यांना अ‍ॅड. बी. जी. केंद्रे, अ‍ॅड. एच. डी. राऊत, अ‍ॅड. कुरडे, अ‍ॅड. केशव काळे, अ‍ॅड. एल ए माने यांनी सहकार्य केले.

टॅग्स :fraudधोकेबाजीSangeeta Thombareसंगीता ठोंबरेBJPभाजपा