शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

धनंजय मुंडेंच्या मालमत्तेला न्यायालयाने लावली टाच; सूतगिरणीसाठी घेतले होते विनातारण कर्ज 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2018 16:35 IST

संत जगमित्रनागा सूतगिरणीसाठी बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून ३ कोटी रुपयांचे घेतलेले कर्ज हे मालमत्ता तारण न ठेवताच होते.

- अविनाश मुडेगांवकर

अंबाजोगाई (बीड) :  विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या ताब्यात असलेल्या संत जगमित्रनागा सूतगिरणीसाठी बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून ३ कोटी रुपयांचे घेतलेले कर्ज हे मालमत्ता तारण न ठेवताच होते. या कर्जापोटी न्यायालयाने धनंजय मुंडे, त्यांच्या सौभाग्यवती राजश्री मुंडे व इतर आठ संचालकांची मालमत्ता गहाण ठेवत त्या मालमत्तेचे हस्तांतरण अथवा ती मालमत्ता इतरत्र गहाण ठेवू नये , असे आदेश अंबाजोगाई येथील दुसरे अप्पर सत्र न्यायाधीश धनंजय देशपांडे यांनी दिले. 

काय आहे प्रकरण ?बीड जिल्ह्यातील अनेक राजकीय पुढाऱ्यांना जिल्हा बँकेच्या कर्ज प्रकरणाने ग्रासलेले आहे.  विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या ताब्यात असलेल्या श्री संत जगमित्रनागा सूत गिरणीने बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून ३ कोटीं रुपयांचे कर्ज घेतले होते. या कर्जासाठी कोणतेही मालमत्ता गहाण न ठेवता अथवा कसलाही बोजा न चढवता बँकेच्या नियमांचे उल्लंघन करत हे तीन कोटींचे कर्ज घेण्यात आले होते. बीड जिल्ह्यातील अनेक पुढाऱ्यांवर कर्ज प्रकरणी गुन्हे दाखल झालेले आहेत. काही प्रकरणे न्यायालयात वर्ग झाले. तर काही प्रकरणांचा तपास पोलिस प्रशासनाकडून सुरू आहे. 

३ कोटींचे कर्ज घेतले विनातारण संत जगमित्रनागा सूतगिरणी प्रकरणाचा तपास बीड जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांच्यामार्फत सुरू  आहे. जी. श्रीधर यांनी काही दिवसांपूर्वी एका तक्रारीद्वारे जगमित्रनागा सूतगिरणीने घेतलेले कर्ज विनातारण कसे घेतले? या संदर्भात अंबाजोगाई येथील न्यायालयाकडे तक्रार अर्ज दाखल केला होता. या तक्रारीची दखल  ५ सप्टेंबर २०१८ रोजी दुसरे अप्परसत्र न्यायाधीश धनंजय देशपांडे यांनी घेतली.  घेतलेले कर्ज विनातारण आढळून आल्याने या कर्जाच्या जबाबदारीपोटी धनंजय मुंडे, राजश्री धनंजय मुंडे व सूतगिरणीचे आठ संचालक  यांची मालमत्ता कर्जापोटी तारण ठेवून ती मालमत्ता इतरांना हस्तांतरित करू नये. अथवा इतर संस्थांना गहाण ठेवू नये. असे आदेश पारित केले आहेत. यासंदर्भात २० आॅक्टोबर २०१८ रोजी धनंजय मुंडे यांना आपले म्हणणे मांडण्याची संधी देण्यात आली आहे. 

डीसीसी बँकेच्या घोटाळ्यात बीड जिल्ह्यातील अनेक पुढाऱ्यांचा असलेला समावेश व त्यांच्यावर दाखल झालेले गुन्हे हे प्रकरण राज्यभर गाजत असतांना धनंजय मुंडे यांचे ऐरणीवर आलेले हे प्रकरण यामुळे राजकीय गोटात खळबळ उडाली आहे.

टॅग्स :Dhananjay Mundeधनंजय मुंडेBeedबीडbankबँकCourtन्यायालय