शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
4
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
5
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
6
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
7
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
8
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
9
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
10
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

सावरगावातील दसरा मेळाव्याकडे देशाचे लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2019 00:20 IST

बीड : पाटोदा तालुक्यातील सावरगाव घाट येथे ८ आॅक्टोबर रोजी होत असलेल्या दसरा मेळाव्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा , ...

ठळक मुद्देअमित शहा, देवेंद्र फडणवीस येणार : भगव्या पताकांनी सजणार संत भगवानबाबांचे जन्मस्थळ

बीड : पाटोदा तालुक्यातील सावरगाव घाट येथे ८ आॅक्टोबर रोजी होत असलेल्या दसरा मेळाव्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच दिग्ग्ज नेते उपस्थित राहणार असून या मेळाव्याकडे देशाचे लक्ष लागले आहे.लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनी सुरू केलेली दसरा मेळाव्याची परंपरा राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी अखंडपणे सुरु ठेवली आहे. भगवानगडावर दसरा मेळावा होत होता. गत दोन वर्षांपासून संत भगवानबाबांच्या जन्मभूमीत सावरगाव घाट येथे भगवान भक्तीगडावर पंकजा मुंडे यांनी दसरा मेळावा सुरु केला. या मेळाव्यासाठी महाराष्टÑासह विविध राज्यातून लोखोंच्या संख्येने भक्तगण येणार आहेत. या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने तगडा बंदोबस्त नियुक्त केला आहे. पोलिस अधिक्षक हर्ष पोद्दार, अप्पर पोलीस अधिक्षक विजय कबाडे यांनी आयबी, सीआयडी, सीआरएफ या सुरक्षा यंत्रणांच्या अधिकाऱ्यांसह पाहणी केली.रामगडावरही मेळावाबीड तालुक्यातील श्री क्षेत्र रामगड येथे मंगळवारी सकाळी ११ वाजता दसरा मेळाव्याचे आयोजन केले आहे. तत्पूर्वी सकाळी साडेदहा वाजता नामलगाव फाटा ते श्री क्षेत्र रामगडापर्यंत दुचाकी रॅली निघणार आहे. पंचक्रोशीतील भक्तांनी उपस्थित राहण्याचे आवाहन मठाधिपती लक्ष्मण महाराज यांनी केले आहे.बारा एकर जागेत मेळावामेळाव्यासाठी भगवान भक्तीगडाच्या बारा एकर मोकळ्या जागेवर दोन व्यासपीठ उभारले आहेत.एका व्यासपीठावर केंद्रीय मंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, खा. डॉ. प्रितम मुंडे यांच्यासह प्रमुख असतील.दुसºया व्यासपीठावर पक्षाचे आजी- माजी आमदार, राज्यातून येणारे पक्षाचे उमेदवार आदी उपस्थित राहणार आहेत.३७० तोफांची सलामीसावरगावातील भगवान भक्तीगडावर मेळाव्यासाठी लाखोंच्या संख्येने लोक येणार असल्याने या ठिकाणी गर्दीचा उच्चांक मोडला जाणार आहे. मंत्री पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आयोजकांनी गृहमंत्री अमित शहा यांनी ३७० कलम रद्द केल्यामुळे ३७० तोफांची सलामी आणि ३७० तिरंग्या झेंड्यांनी स्वागत केले जाणार आहे. तर सभास्थळी एक लाखापर्यंत भगवे झेंडे लावण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.

टॅग्स :BeedबीडPankaja Mundeपंकजा मुंडेAmit Shahअमित शहाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस