शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
2
आजचे राशीभविष्य १३ मे २०२५ : या राशींना आर्थिक लाभ, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
3
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
4
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
5
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
6
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
7
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
8
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय
9
३२ विमानतळ पुन्हा सुरू करण्याची तयारी; भारत-पाकिस्तान संघर्षामुळे विमान उड्डाणे होती बंद
10
पाकच्या ताब्यातील जवानाच्या पत्नीशी संवाद; सुटकेसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन, फोनवर चर्चा
11
संरक्षण दलांना राज्यात सर्वतोपरी मदत: मुख्यमंत्री; तिन्ही दलांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक
12
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सायबर हल्ल्यांचा आकडा १५ लाखांवर; फक्त १५० यशस्वी, सायबर विभागाचा तपास
13
दहावीचा निकाल आज... मित्रांनो, मनासारखे नाही झाले, तरी हार मानू नका 
14
मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला अवकाळीचा तडाखा; पिकांनी टाकल्या माना, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
15
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील जखमी म्हणतात, आजही तेथून जाताना हृदयात चर्रर्र होतं
16
नवीन होर्डिंग धोरण वर्षभरानंतरही कागदावरच! घाटकोपर दुर्घटनेला वर्ष होऊनही महापालिका गप्पच
17
शाहरुख खानच्या ‘त्या’ कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला ६२ लाखांची भरपाई योग्यच; हायकोर्टाचे आदेश
18
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
19
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
20
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प

CoronaVirus : धक्कादायक ! ८०० किमी चा प्रवास; पण साधे हटकले नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2020 19:20 IST

बीड, अंबाजोगाई, माजलगाव, आष्टी मार्गावर दुचाकीवरून प्रवास

ठळक मुद्देदुचाकीवरून फिरणाऱ्यांकडे यंत्रणेचे दुर्लक्ष ?

बीड : सध्या सर्वत्र लॉकडाऊन आहे. तसेच विनाकारण फिरण्यास बंदी आहे. पोलिसांकडून गस्त घातल्याचा दावा केला जात आहे. परंतु मागील तीन दिवसांत तब्बल ८०० किलो मिटरचा प्रवास केला तरी अंमळनेर वगळता कोणीच साधी हटकण्याची तसदीही घेतली नाही. हा प्रवास बीड, अंबाजोगाई, माजलगाव, आष्टी मार्गावरून केला होता. पोलिसांनी याकडे सकारात्मक पाहून यंत्रणेला सुचना करण्याची गरज आहे. 

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वत्र लॉकडाऊन आहे. जिल्ह्यात संचारबंदी कायदा लागू करण्यात आलेला आहे. अत्यावश्यक सेवेला पास देण्यात आलेले आहेत. याच पासच्या अनुषंगाने जिल्ह्यात तीन दिवसांत ८०० किलो मिटरच्या अंतरावर दुचाकीवरून प्रवास केला. परंतु कोणीही हटकले नाही. पाटोदा तालुक्यातील अंमळनेर येथे मात्र, काही पोलिसांनी रितसर चौकशी करून आणि पास पाहुन पुढील प्रवासाला परवानगी दिली. त्यानंतर बीड, अंबाजोगाई, धारूर, वडवणी, केज, अंबाजोगाई, गेवराई, माजलगाव, पाटोदा, आष्टी या तालुक्यांतून प्रवास केला. पण कोणीच हटकले नाही. त्यामुळे बाहेरून येणारे लोक किंवा दुचाकीवरून फिरणाऱ्या लोकांकडे यंत्रणा दुर्लक्ष करतेय काय? याचा दुर्लक्षाचा गैरफायदा घेऊन बाहेरचे लोक छुप्या मार्गाने जिल्ह्यात प्रवेश करीत आहेत का? असा सवाल उपस्थित होत आहे. दरम्यान, बाजू समजून घेण्यासाठी जनसंपर्क अधिकारी सपोनि विलास हजारे यांना संपर्क केला. पोलीस अधीक्षकांशी बोलून सांगतो, असे ते म्हणाले. उशिरापर्यंत त्यांनी बाजू सांगितली नाही. 

पोलिसांच्या चौकाचौकात बैठकाया प्रवासादरम्यान, शहरांतील काही मुख्य चौकांमध्ये बंदोबस्तावर नियूक्त केलेले पोलीस अधिकारी, कर्मचारी सावलीत आराम करताना दिसले. त्यांच्यासमोरून अनेक वाहने भरधाव वेगाने जात होते. चौकशी करण्यास ते कानाडोळा करीत होते. हाच कानाडोळा बीडकरांना त्रासदायक ठरू शकतो, अशी चर्चा आहे. त्यामुळे बंदोबस्तावर असलेल्यांनी तत्पर कर्तव्य बजावण्याची आवश्यक आहे. 

असा झाला प्रवास..शनिवारी बीड-वडवणी-धारूर-आडसमार्गे अंबाजोगाई नंतर अंबाजोगाईहून लोखंडीसावरगाव - केज- नेकनूर - मांजरसुंबामार्गे बीड. रविवारी बीड - वडवणी व तालुक्यातील ग्रामीण भाग. पुन्हा त्याच मार्गाने बीडला परत. सोमवारी बीड- अंमळनेर- धामणगाव - कडा - धानोरा - कडा - आष्टी - डोईठाण  - अंमळनेरमार्गे पुन्हा बीड परत. त्याच दिवशी बीड - गढी - माजलगाव आणि त्याच मार्गाने परत. असा प्रवास दुचाकीवरून (रितसर पास घेऊन) करण्यात आला. हा प्रवास करताना नियमांचे पूर्णपणे पालन करण्यात आले होते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसBeedबीड