शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : कोरोना विरोधात बीड सज्ज; शहराची ८५ गटात विभागणी करून तपासणीला १८ पथके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2020 19:26 IST

बीड पालिकेने केले सूक्ष्म नियोजन

ठळक मुद्देएका गटात चार शेतकरी, दोन हातगाड्यांचा समावेश

बीड : सोशल डिस्टन्सींग ठेवण्यासह गर्दी टाळण्यासाठी आता यापुढे एका ठिकाणी बसून भाजीपाला विक्री करणे बंद केले आहे. यासाठी शहरात ८५ गटात विभागणी करून एका गटात चार शेतकरी व दोन हातगाडे वाल्यांना परवानगी दिली आहे. तसेच सर्वच प्रकारच्या दंडात्मक कारवायांसाठी १८ पथकांची नियूक्ती बीड पालिकेने केली आहे. 

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध नियोजन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. रस्त्यावर बसुन भाजीपाला विकण्यास बंदी घातली आहे. सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, विनाकारण वाहने बाहेर आणण्यास बंदी घातली आहे. तोंडाला मास्क अथवा रूमाल न लावणे, १८ वर्षांखालील व ६० वर्षांपुढील नागरिकांना बाहेर येण्यास मज्जाव केला आहे. किराणा दुकानदारांनी दर्शनी भागात दरपत्रक लावणे आदी नियम घालण्यात आलेले आहे. हाच धागा पकडून बीड पालिकेने बीड शहरात नियोजन केले आहे. भाजी विक्रेत्यांसाठी शहरात ८५ मार्ग ठरवून दिलेले आहेत. एका मार्गावर किमान चार शेतकरी व दोन हातगाडेवाले असणार आहेत. तसेच या सर्व बाबींवर नजर ठेवण्यासाठी १८ पथकांची नियूक्ती केली आहे. याचे जबाबदारी सर्व स्वच्छता निरीक्षकांवर दिली आहे. एका निरीक्षकांकडे किमान ५० कर्मचारी असणार आहेत. 

मोबाईलमध्ये शुटींग करून कारवाईजे लोक नियमांचे उल्लंघण करतील, अशांचे मोबाईलमध्ये चित्रीकरण केले जाणार आहे. याचाच आधार घेऊन नंतर पोलिसांच्या मदतीने दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. एकदा दंड भरल्यानंतर पुन्हा आढळल्यास त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन नगर पालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईबीड शहराची ८५ गटात विभागणी करून प्रत्येक गटात किमान चार शेतकरी व दोन हातगाडे वाले राहतील. सर्व घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघण करणाºयांवर कारवाईसाठी १८ पथके नियूक्त केली आहेत. नागरिकांनी दिलेल्या सुचनांचे पालन करून सहकार्य करावे.- डॉ.उत्कर्ष गुट्टे, मुख्याधिकारी, नगर परिषद बीड

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसBeedबीड