शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus: नागरिकांच्या समस्या सोडवण्याऐवजी बालिश राजकारण केले जातेय- जयदत्त क्षीरसागर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2020 17:10 IST

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी क्षीरसागर यांनी नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप करत त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. या आरोपाला माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी उत्तर दिलं आहे.

बीड : मला शासकीय नियमांची पूर्ण जाणीव होती. त्यामुळे औरंगाबाद येथे अधिकाऱ्यांची परवानगी घेऊन बीड जिल्ह्यात आलो आहे.  शनिवारी जयदत्त क्षीरसागर हे औरंगाबादवरून बीडला आले होते. त्यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी क्षीरसागर यांनी नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप करत त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. या आरोपाला माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी उत्तर दिलं आहे.ते म्हणाले, जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेऊन संचारबंदी काळात शेतकरी, कष्टकरी व इतर शहरवासीयांच्या समस्या सोडवण्यासाठी संबंधित यंत्रणेला सूचना दिल्या आहेत. कोरोना संसर्ग टाळण्यासाठी योग्य त्या उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र या काळात देखील काही जण बालिश राजकारण करत आहेत. दरम्यान, ऊसतोड कामगार व हातावर पोट असणाऱ्यांचा प्रश्न गंभीर आहे. त्यामुळे त्यांची व्यवस्था प्रशासनाकडून योग्य पद्धतीने केल जात आहे का, याच्यावर आमचे लक्ष असणार आहे. तसेच  जिल्ह्यातील परिस्थितीसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बोलणार असल्याचे क्षीरसागर यावेळी म्हणाले.

टॅग्स :Jaydutt Kshirsagarजयदत्त क्षीरसागरcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस