शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

coronavirus : बीडमध्ये ‘दुबई रिटर्न’ महिला कोरोना संशयित; जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2020 17:06 IST

आरोग्य विभागाकडून तपासणीला सुरूवात 

ठळक मुद्दे पुण्यात तपासणी झाल्यावर सकाळीच जाणवले लक्षणे

बीड : दुबईहुन सकाळीच बीडमध्ये आलेल्या एका ७० वर्षीय महिलेला सर्दी, ताप, खोकल्यासारखी लक्षणे जाणवू लागली. त्यानंतर तात्काळ या महिलेला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तपासणी करून स्वॅप घेऊन तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविला जाणार आहे. 

बीड शहरातील एक ७० वर्षीय महिला आपल्या बहिणीकडे फेब्रुवारी महिन्यात दुबईला गेली होती. आज पहाटे ती पुणे विमानतळावर आली. येथे तिची तपासणी करण्यात आली. परंतु लक्षणे नसल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. सकाळी सहा वाजता ती बीडमध्ये पोहचली. आठ वाजेच्या सुमारास तिला खोकला, ताप, सर्दी अशी लक्षणे जाणवू लागली. तिने खाजगी दवाखाना गाठला. त्यानंतर तिच्या मुलाने ही माहिती प्रशासन व आरोग्य विभागाला दिली. त्यांना आता जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टर, कर्मचाऱ्यांची टिम तपासणी करण्याच्या कामालाही लागली असल्याचे सांगण्यात आले. तिचे स्वॅब घेऊन तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले जाणार आहेत. अहवाल आल्यावरच कोरोना आहे की नाही, हे समजणार आहे.ही केवळ उपचाराची प्रक्रिया आहे. तपासणीला घेतले म्हणजे, त्या महिलेला आजार आहे, असे होत नाही. नागरिकांनी घाबरून जावू नये, काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासन व आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात आले आहे. 

आरोग्य विभागाची तत्परता कागदावरचमहिला दुबईहुन आल्याची माहिती वारंवार आरोग्य विभाग व प्रशासनाला दिली जात होती. परंतु केवळ गाजावाजा करणाऱ्या अधिकाऱ्यांकडून या महिलेकडे दुर्लक्ष करण्यात आले. शेवटी महिलेच्या मुलानेच तिला साध्या रुग्णवाहिकेतून जिल्हा रुग्णालयात नेल्याची महिती आहे. आरोग्य विभागाकडून आतापर्यंत केवळ कागदोपत्रीच गाजावाजा केला जात होता. या महिलेस आरोग्य विभागाच्या पथकाने घरी जावून तपासणी करण्याची आवश्यकता होती. परंतु तसे झाले नसल्याने आरोग्य विभागाबद्दल संताप व्यक्त होत आहे.

संपर्क अधिकारी अनभिज्ञकोरोनाबद्दल काही अडचण असल्यास किंवा संशयीत आल्यावर तपासणीसाठी प्रत्येक तासाला एका वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियूक्ती केली आहे. परंतु दुबईहुन परतलेल्या महिलेबद्दल नियूक्त केलेल्या संपर्क अधिकाऱ्यांना कसलीच माहिती नव्हती. त्यांनी आढावाही घेतला नाही. ४ ते ५ यावेळेत असणाऱ्या डॉ.अस्वले यांना विचारणा केली असता मला माहिती नाही, विचारून सांगतो, असे सांगितले. यावरून आरोग्य विभाग किती गाफिल हे स्पष्ट होते.

दुबईहुन परतलेली महिला जिल्हा रुग्णालयात आल्याचे समजले आहे. आली असेल तर तिला आयसोलेशन वॉर्डमध्ये दाखल करण्यास सांगितले आहे. डॉक्टर, कर्मचारी लवकरच तिची तपासणी करून स्वॅब प्रयोगशाळेत पाठविले जातील. अहवाल आल्यानंतरच पुढे समजेल.-डॉ.अशोक थोरात,जिल्हा शल्य चिकित्सक, बीड

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसBeedबीडBeed civil hospitalजिल्हा रुग्णालय बीड