शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : बीड शहरासह बारा गावांमध्ये 4 जूनपर्यंत संचारबंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2020 01:32 IST

कोरोना बाधित एका रुग्णाचा शहरातील तीन दवाखान्यासह विविध ठिकाणी संपर्क आल्याची माहिती स्पष्ट होत असल्याने प्रशासनाला हा कठोर निर्णय घ्यावा लागला.

ठळक मुद्देबीड जिल्ह्यात  कोरोनाचे  एकूण 56 रुग्ण

बीड : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून फौजदारी प्रक्रिया दंड संहिता 1973 चे कलम 144 नुसार 4 जूनपर्यंत संपूर्ण बीड शहरात तसेच बारा गावांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी बुधवारी रात्री बारा वाजेदरम्यान सदर आदेश लागू केले आहेत.

कोरोना बाधित एका रुग्णाचा शहरातील तीन दवाखान्यासह विविध ठिकाणी संपर्क आल्याची माहिती स्पष्ट होत असल्याने प्रशासनाला हा कठोर निर्णय घ्यावा लागला. संपूर्ण बीड शहर तसेच बीड तालुक्यातील खंडाळा, चऱ्हाटा, पालवण,ईट, पाटोदा तालुक्यातील वैजाळा,डोंगर किन्ही,  वडवणी तालुक्यातील देवडी, गेवराई तालुक्यातील खांडवी, मादळमोही, धारवंटा, केज तालुक्यातील खरमाटा आणि धारुर तालुक्यातील पारगाव या गावांमध्ये आठ दिवसांसाठी 4 जून रोजी रात्री बारा वाजेपर्यंत संपूर्ण संचारबंदी घोषित करण्यात आली आहे त्यानुसार कुणालाही घराबाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे वैद्यकीय सेवा,  वर्तमानपत्रे,  माध्यमांविषयी सेवा 24 तास सुरू राहतील. बीड शहरात वरील गावांमध्ये विशेष परवानगीशिवाय कोणालाही या कालावधीत प्रवेश करता येणार नाही. तसेच शहराबाहेरही जाता येणार नाही. 

अत्यावश्यक सेवांची शासकीय कार्यालय वगळता सर्व कार्यालये बंद राहतील. परंतु बीड शहरातील शासकीय कार्यालयांचे विभाग प्रमुख आणि बँकांना अतिशय आवश्यकता भासल्यास उपजिल्हाधिकारी रोहयो बीड यांच्याशी संपर्क साधून अत्यावश्यक बाब म्हणून कार्यालय उघडण्याची तसेच अतिशय मर्यादित कर्मचाऱ्यांना बोलण्याची परवानगी घ्यावी. बीड शहरातील व इतर या गावातील नागरिकांना इतर जिल्ह्यात व राज्यात जाण्यासाठी ऑनलाईन व ऑफलाईन पास मिळणार नाही. परंतु मेडिकल अत्यावश्यक मधील पाससाठी बीड शहरातील नागरिकांनी ऑनलाइन अर्ज संकेत स्थळावर भरून प्राप्त करून घ्यावा. 

बीड शहरातील तसेच या 12 गावातील सर्व नागरिकांनी आरोग्य सेतू ॲप तात्काळ डाऊनलोड करून वापरणे बंधनकारक राहील. विषाणूंच्या अनुषंगाने ताप, सर्दी, खोकला डोकेदुखी, श्वसनास त्रास आदी लक्षणे आढळून आल्यास सदर ॲप मध्ये सेल्फ असेसमेंट  सदराखाली आपली माहिती तात्काळ भरावी, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

ध्वनीक्षेपकाद्वारे दिली माहितीबीड शहरात  27 मे रात्री बारा वाजेपासून पुढील आदेशापर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. यासंदर्भात रात्री 11:30 वाजेपासून पोलिसांनी ध्वनिक्षेपकाद्वारे नागरिकांना सार्वजनिकरीत्या कळविले आहे. या कालावधीत कोणालाही फिरता येणार नाही. वाहनावरून जर कोणी जात असेल तर ते वाहन जप्त करण्यात येईल अशी तंबी देण्यात आली आहे. 

जिल्ह्यात ५६ रुग्णजिल्ह्यात आतापर्यंत आढळलेल्या कोरोना बाधित रुग्णांची संख्या 56 झाली आहे. बुधवारी 45 स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी 1 अहवाल पॉझिटिव्ह आला असून 41 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर 3 अहवाल अनिर्णित आले आहेत. पॉझिटिव आलेला रुग्ण बीड तालुक्यातील बेलापूरी येथील असल्याची माहिती मिळत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसBeedबीड