शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
2
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
3
Operation Sindoor Live Updates: स्फोटाचा आवाजांमुळे अमृतसरमध्ये रात्रभर ब्लॅक आऊट; पोलिस म्हणतात काहीच सापडले नाही
4
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
6
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
7
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
8
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
9
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
10
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
11
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
12
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
13
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
14
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
15
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
16
चंद्रावर उमटणार भारतीय अंतराळवीराचे पदचिन्ह
17
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा
18
रोहितने ‘तो’ निर्णय तेव्हाच घेतलेला? गंभीर आलेला, पण रोहित शर्मा अनुपस्थित होता... 
19
रोहित शर्माने घेतली कसोटीतून तडकाफडकी निवृत्ती; इंग्लंड दौऱ्यात मिळणार होता डच्चू...
20
गोष्ट मिठी नदीच्या न उपसलेल्या गाळाची..., गाळाने भरले भ्रष्ट अभियंत्याचे खिसे; चौकशीतून स्पष्ट 

CoronaVirus : 'ये आफत नही थी तब अच्छा था'; इर्शादभाईंच्या फुग्याला कोरोनाची टाचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2020 19:45 IST

आधी मिळत होते अडीच हजार, आता मिळतात ५० रुपये

ठळक मुद्देहम बुढे को कितना लगताफुगे विक्रीतून उदरनिर्वाह 

- अनिल भंडारी बीड : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे मोठ्यांसह छोट्यांचे ही कंबरडे मोडले आहे. दिवसभर गावात फिरुन फुगे विक्रीतून मियां -बिवीचा गुजारा करणाऱ्या इर्शादभार्इंच्या फुग्यालाही कोरोनाची टाचणी टोचल्याने त्यांची जीवनघडी विस्कटली आहे.  दिवसाकाठी दोन ते अडीच हजार रुपये मिळविणाऱ्या इरशादभार्इंच्या पदरात सध्या ४०- ५० रुपये कसेबसे पडत आहेत. 

शहरातील सय्यदअली कॉलनी भागात राहणारे इर्शादभाई त्यांच्या सायकलवर फुगे लावून विक्री करतात. छोट्या वस्तीपासून वर्दळीच्या रस्त्यापर्यंत ज्या भागात लहान मुलांचा वावर असतो तेथे फुगे विकून दोन पैसे कमावतात. रडणाऱ्या मुलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविताना कुटुंबाची गुजराण करण्यासाठी त्यांनी हा मार्ग निवडला. दोन वर्षांपासून स्वत:ची सायकल, हवा भरण्याचा पंप आणि फुग्यांची पिशवी घेऊन इरशादभाई गावभर फिरतात.

 सायकलच्या हॅँडलवर लावलेले फुगे पाहून बच्चे कंपनीबरोबरच मोठेही आकर्षित होतात. परंतू २१ मार्चपासून कोरोनामुळे उद्भवलेली स्थिती आणि त्यानंतरच्या लॉकडाऊनमुळे सुरुवातीचे काही दिवस वगळले तर नंतर एक दिवसाआड केवळ अडीच तासच त्यांना फुगे विकता येतात. या अडीच तासात गावभर फिरणे अशक्यच. यात्रा जत्रा, लग्नसराई वा इतर कार्यक्रम नसल्याने आजुबाजुला उभे राहून होणाºया विक्रीलाही ब्रेक लागला आहे. त्याचबरोबर फुग्यांची होणारी विक्रीही अत्यल्प होत आहे. जेमतेम ४० - ५० रुपये मिळतात, असे इर्शादभाई म्हणाले. 

हम बुढों को कितना लगता? इर्शादभाई व त्यांची पत्नी हे दोघे एका घरात राहतात. इतर सर्व वेगळे राहतात. हम बुढों को कितना लगता साब, जो है उसीसे गुजारा कर लेते है. लोकांनी धान्य, किराणाची सहानुभूतीपूर्वक मदत केली. रेशनचे धान्यही मिळाले. त्यावरच दिवस काढत असल्याचे ते म्हणाले. 

बच्चे कंपनीची प्रतीक्षा, भेट झाली दुर्मिळधडधाकट असताना कष्ट झेलत हमाली कामातून कुटुंबाचा उदरनिर्वाह केला. उम्र का तकाजा होने से अब हमाली काम नहीं होता, इसलिए गुब्बारे बेचता हूं असे इर्शादभाई म्हणाले. सध्या फुगेवाले इर्शादभार्इंची  गल्लोगली वाट पाहणाऱ्या मुलांशी लॉकडाऊनमुळे भेट दुर्मिळ झाली आहे. विविध क्षेत्रातील अशा अनेक इर्शादभाईंच्या रोजी रोटीकडे कोणी लक्ष देणार आहे काय? 

ये आफत नहीं थी तब ५००-१००० गुब्बारे बिकते थेसाब,  जब ये आफत नहीं थी तब ५००- १००० गुब्बारे बिकते थे, अब बसर नहीं होता. क्या करेंगे, चायपानी का खर्चा निकल जाता, असे म्हणताना इर्शादभार्इंच्या मनात शल्य होते, परंतू आहे त्या परिस्थितीचा मुकाबला करण्याची धडपड  त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होती. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसBeedबीड