शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : कोरोना खबरदारी ! खतांच्या खरेदीला आता ‘अंगठा’ लागणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2020 12:50 IST

कोरोना संसर्ग टाळण्यासाठी देशातील २ लाख २७ हजार इपॉसवर पर्याय

ठळक मुद्देखते, रसायन मंत्रालयाचे निर्देश

बीड : येत्या खरीप हंगामासाठी खते खरेदी करणाऱ्या शेतकऱ्याला इपॉस मशिनवर अंगठा  द्यावा लागणार नाही. कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी केंद्राच्या रसायन व खते मंत्रालयाने बायोमेट्रीकशिवाय खतांच्या विक्रीबाबत निर्देश जारी केले आहेत. त्यानुसार देशातील २ लाख २७ हजार इपॉस मशिनला खरेदीदारांचा स्पर्श न होता व्यवहार होणार आहेत. परिणामी कोट्यावधी शेतकऱ्यांचे संभाव्य संसर्गापासून रक्षण होणार आहे. 

आॅल इंडिया अ‍ॅग्रो इनपुट डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष मनमोहन कलंत्री यांनी  खतांच्या विक्रीसाठी पॉस डिव्हाइसमध्ये ग्राहक प्रमाणीकरणाला सूट देण्याची मागणी रसायन व खते मंत्रालयाकडे निवेदनाद्वारे केली होती. देशात कोरोना महामारीमुळे २५ मार्चपासून सर्व कामे बंद आहेत. येत्या खरीप हंगामासाठी खतांच्या विक्रीसाठी सरकारच्या पॉस नियमानुसार पॉस डिव्हाइसद्वारा अनुदानित खतांची विक्री प्रमाणित करण्यासाठी प्रत्येक ग्राहकाच्या अंगठ्याचे ठसे घ्यावे लागतात. प्रत्येक विक्रीनंतर खत विक्रेते सॅनिटायझरचा वापर करत आहेत. तरीही इपॉसवर अंगठा किंवा बोटांचा ठसा आवश्यक असतो. यात विक्रेत्यांनाही शेतकऱ्यांची मदत करावी लागते. त्यामुळे सामाजिक अंतर ठेवणे अशक्य आहे. सध्या कोरोनाचा संसर्ग मोठ्या शहरांमध्ये दिसून येत आहे, तर ग्रामीण भाग सुरक्षित आहे. त्यामुळे ही सुरक्षितता कायम राखण्यासाठी येत्या खरीप हंगामात खते विक्रेत्यांना आॅफलाईन विक्रीची परवानगी द्यावी किंवा ग्राहक प्रमाणिकरणाच्या सुविधेत ३० सप्टेंबरपर्यंत परवानगी देण्याची मागणी या निवेदनात केली होती. या मागणीची दखल घेत रसायन व खते मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव धरम पाल यांनी दिशा निर्देश जारी केले आहेत. त्यानुसार खते खरेदी करणाऱ्या शेतकऱ्याला इपॉसवर अंगठा लावण्याची गरज राहणार नाही.

इपिक, केसीसीचा पर्यायनिवडणूक ओळखपत्र (इपिक) किंवा किसान क्रेडीट कार्डवरील (केसीसी) क्रमांक व नावानुसार रिटेल पार्इंटवर खते विक्री करता येतील, त्यामुळे शेतक-यांच्या अंगठ्याचा ठसा लावण्याची गरज नाही.  सर्व विक्रेत्यांनी कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी आधी खते खरेदी करणाऱ्यांचे हात निर्जंतुकीकरण करावे, तसेच खते विक्रीनंतरही सुरक्षिततेबाबत दक्षता घेण्याचे निर्देश रसायन व खते मंत्रालायाचे अतिरिक्त सचिव धरम पाल यांनी दिले आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसBeedबीडFarmerशेतकरी