शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : माजलगावात स्वस्त धान्य दुकानदारांची मनमानी; अनेक दुकाने बंद,पावत्यांचा गोलमाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2020 16:52 IST

सर्व्हर डाऊनच्या नावाखाली पावत्यांचा गोलमाल

ठळक मुद्देस्वस्त धान्य दुकानावर नियुक्त निरीक्षक कर्मचारीही गैरहजरमोफत धान्याचे ठराविक लाभार्थ्यांनाच वाटप

- पुरूषोत्तम करवा माजलगाव : लॉकडाऊनच्या काळात गोरगरीब जनतेची सोय व्हावी यासाठी शासनाने सुरु केलेल्या मोफत धान्य वाटप योजनेत स्वस्त धान्य दुकानदारांचा मनमानी कारभार सुरु आहे. अनेक दुकाने सकाळी नऊ वाजले तरी बंद होते, अनेक ठिकाणी नेमून दिलेले शासकीय अधिकारी गैरहजर, धान्य मोजून देण्या ऐवजी अंदाजे देण्याचा प्रकार सुरु होता तर, सर्व्हर डाऊनच्या नावाखाली ग्राहकांना पावत्या न देण्याचा प्रकार सर्रासपणे सुरु असल्या प्रकार मंगळवारी  रोजी सकाळी दिसून आले. 

कोरोनाचा फैलाव देशासह राज्यात मोठ्या वेगाने सुरु असल्याने पंतप्रधानांनी मागील महिनाभरापासून संपूर्ण लॉकडाऊन सुरु केले आहे. सर्व व्यवहार ठप्प असल्याने हातावर पोट असलेल्यांची उपासमार होऊ नये यासाठी केंद्र शासनाने देशातील सर्वसामान्यांना मोफत धान्य वाटप सुरु केले आहे. काही योजनेतून मोफत तर, अनेकांना सवलतीच्या दरात रेशनचे धान्य वाटप सुरु असल्याने स्वस्त धान्य दुकानासमोर सध्या रांगा लागत आहेत. धान्य देताना कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या उपाययोजनेची खबरदारी घेण्यासाठी नियमाचे पालन करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी धान्य दुकानदारांना दिले आहेत. यासाठी प्रत्येक दुकानावर शासकीय कर्मचाऱ्याची नियुक्ती महसूल प्रशासनाने केली आहे. असे असताना मात्र माजलगाव शहरासह तालुक्यात स्वत धान्य दुकानदारांची मनमानी सुरु असल्याने अनेक ग्राहकांना धान्यापासून वंचित राहावे लागत आहे. 

तालुक्यात एक दिवसाआड संचारबंदीची सूट असून या अडीच तासाच्या काळात धान्याचे वाटप करणे बंधनकारक आहे. असे असताना मंगळवारी दि. २१ रोजी शहरातील स्वस्त धान्य दुकानांना भेटी देऊन आढावा घेतला असता, अनेक दुकाने सकाळी नऊ वाजले तरी बंद असल्याचे आढळून आले. सुरु असलेल्या दुकानात दुकानदारांचा मनमानी कारभार सुरु असल्याचे आढळून आले. काही दुकानदार सर्व्हर डाऊन असल्याच्या नावाखाली ग्राहकांना कोणतीच पावती देत नव्हते. काही दुकानात शासनाचे मोफत धान्य ग्राहकांना मोजून न देता अंदाजे देऊन कमी धान्य देत असल्याचा प्रकार पाहायला मिळाला. शहरातील मठ गल्लीतील काही दुकान दिवसभर न उघडल्याने वात पाहून ग्राहकांना हातहालवत परत जावे लागले. याठिकाणी नियुक्त असलेल्या शासकीय कर्मचाऱ्याची गैरहजेरी संशय निर्माण करणारी होती तर, स्वस्त धान्य दुकानासमोरी भावफलकही गायब झाल्याचे आढळून आले. लॉकडाऊनमुळे गोरगरिबांची उपासमार होऊ नये यासाठी शासन आटोकाट प्रयत्न करीत असले तरी, काह्ल्च्या यंत्रणेच्या अर्थपूर्ण दुर्लक्षामुळे सर्वसामान्य नागरिकांचे हाल मात्र कायम असल्याचे दिसून आले आहे.

ठराविक नागरिकांनाच वाटपशहरातील मोंढा येथील दुधडेअरी भागातील मार्केट फेडरेशनच्या स्वस्त धान्य दुकानचालक भागवत भोसले हे या भागातील नगरसेवक असल्याने वार्डातील ठरावीक लोकांनाच धान्याचे वाटप प्राधान्याने करीत असल्याने आम्हाला सतत चकरा मारव्या लागत असल्याचे धान्य घेण्यासाठी आलेल्या महिलांनी सांगितले.  

तालुक्यातील कार्ड धारक 

एकूण १७८ स्वस्तधान्य दुकाने यात अंत्योदय कार्ड धारक – ३ हजार ४१२प्राधान्य कार्ड धारक – ३९ हजार ९४९शेतकरी कार्ड धारक – १५ हजार ३३१एकूण कार्ड धारक – ५७ हजार ६६७

दोषींवर कारवाई करण्यात येईलसंचारबंदी सूटच्या काळातही स्वस्त धान्य दुकाने का बंद ठेवण्यात आले त्याची दुकानचालकांना तहसील कार्यालयात बोलवून चौकशी करण्यात येईल. दोषी दुकानचालकांवर कारवाई करण्यात येईल.- प्रकाश शिरसेवाड, नायब तहसीलदार, पुरवठा विभाग

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसBeedबीड