शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : कौतुकास्पद ! आईच्या मृत्यूनंतर उत्तरकार्याचा खर्च टाळून मुख्यमंत्री निधीस मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2020 18:17 IST

दुःख बाजूला ठेवत कुटुंबाचे कोरोना विरुद्ध लढ्यासाठी योगदान

परळी: कोरोना च्या संकटामुळे  लॉकडाऊन च्या पार्श्वभूमीवर सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून आई च्या निधनानंतर  गंगापूजनाचा ( गोड जेवणाचा / उत्तर कार्य ) कार्यक्रमाचा खर्च मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड 19 ला देण्याचा निर्णय परळीच्या प्रशांत भास्करराव जोशी व  कुटुंबीयांनी घेतला आहे .       

येथील गणेशपार विभागातील इंदुबाई  भास्करराव जोशी यांचे दि.२  एप्रिल रोजी निधन झाले .त्यांचे चिरंजीव प्रशांत जोशी यांनी आईच्या  चौदावा दिवसाचा कार्यक्रम घरच्या घरी करून होणारा खर्च टाळीत 25 हजार रुपयाचा धनादेश  मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड 19 ला देण्याचे ठरविले, यास जोशी कुटुंबातील सर्वच सदस्य तयार झाले, प्रशांत जोशी हे सामाजिक न्यायमंत्री व बीड जिल्हाचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांचे विशेष कार्यकारी अधिकारी आहेत.

इंदूबाई जोंशी यांचे अचानक  निधन झाले आणि जोशी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. आईच्या निधनास  चौवदा दिवस झाले नसले तरी दोन दिवसानंतर घरीबसूनच प्रशांत जोशी यांनी दुःखाचा डोंगर बाजूला असताना ही  लोकांच्या आडी अडचणी सोडविणे सुरू केले, आणि  कोरोना पार्श्वभूमीवर  आई चा  गोड जेवणाचा  कार्यक्रम न करता घरच्या सदस्याच्या उपस्थित करून होणारा अनावश्यक खर्च टाळला आणि तो  मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड 19 ला देण्याचा निर्णय घेतला , बुधवारी परळी चे तहसिलदार विपीन पाटील यांच्या कडे सुपुर्द केला.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसBeedबीडDeathमृत्यू