शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : बीडसाठी ३० व्हेंटिलेटरची मंजुरी, कोव्हीड रुग्णालयांमध्ये होणार वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2020 11:50 IST

कोरोनामुळे रुग्ण गंभीर झाल्यास त्याला कृत्रीम श्वासोच्छवास लागू शकतो. हाच धागा पकडून बीड आरोग्य विभागाने शासनाकडे व्हेंटिलेटरची मागणी केली होती

ठळक मुद्देआठवडाभरात दाखल होतील व्हेंटिलेटरबीडमध्ये कोव्हिडं रुग्णालयात सज्ज

बीड : कोरोना आजाराचे रुग्ण आढळले तर त्यावर उपाययोजना करण्यासाठी आरोग्य विभाग कामाला लागला आहे. 

कोरोनामुळे रुग्ण गंभीर झाल्यास त्याला कृत्रीम श्वासोच्छवास लागू शकतो. हाच धागा पकडून बीड आरोग्य विभागाने शासनाकडे व्हेंटिलेटरची मागणी केली होती. ३० व्हेंटिलेटवर मंजूरही झाले असून आठवडराभरात ते दाखल होणार आहेत. याचा वापर कोरोनाग्रस्त रुग्णांसाठी उभारलेल्या कोव्हीड रुग्णालयांमध्ये केला जाणार आहे. 

राज्यासह देशभरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. मराठवाड्यातही बीड वगळता सर्वत्र कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढत आहे. बीडचा शुन्य अद्यापही कायम आहे. जर दुर्दैवाने पुढे कोरोनाचे रुग्ण वाढले तर आरोग्य विभागाने अगोदराच  उपाययोजना केल्या आहेत. जिल्ह्यात बीडसह अंबाजोगाई, केज, परळी आणि लोखंडी सावरगाव येथे ७५० खाटांचे कोव्हीड रुग्णालये तयार केले आहेत. येथे प्रत्येक १०० खाटांच्या मागे ८८ लोकांची नियुक्तीही केली आहे. परंतु अचानक जर कोणाची प्रकृती खालावली तर कृत्रीम श्वासोच्छवास देण्यासाठी व्हेंटिलेटरची आवश्यकता भासणार आहे. हाच धागा पकडून बीड आरोग्य विभागाने अगोदरच शासनाकडे याची मागणी केली होती. त्याप्रमाणे ३० व्हेंटिलेटरला मंजुरी मिळाली आहे. आठवडाभरात ते मिळणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

दरम्यान, सध्या बीडमध्ये १०, अंबाजोगाई १०, केज व परळीमध्ये प्रत्येकी १ आणि खाजगी ५७ असे ७९ व्हेंटिलेटर उपलब्ध आहेत. दोन दिवसांपूर्वी गेवराईत माजी मंत्री आमरसिंह पंडीत यांनी ३ व्हेंटिलेटर दिल्याने ही संख्या ८२ वर पोहचली आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घ्यावी. अफवांवर विश्वास ठेवू नये, आरोग्य यंत्रणेकडून उपाययोजना आणि नियोजन केले जात आहे. घरातच थांबून सुरक्षित रहावे. प्रशासनाच्या सुचनांचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

बीडचे कोव्हीड रुग्णालय झाले सज्जबीडमध्ये २५० खाटांचे स्वतंत्र कोव्हीड रुग्णालय तयार केले आहे. प्रत्येक खाटासाठी स्वतंत्र व अद्ययावत कक्ष तयार केला आहे. सर्वत्र आॅक्सीजनची व्यवस्था केली आहे. याचा आढावा रविवारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांनी घेतला. काही त्रुटी होत्या त्या पूर्ण करण्याच्या सूचना केल्या. यावेळी अतिरिक्त जिल्हा  शल्य चिकित्सक डॉ.सुखदेव राठोड, डॉ.ए.आर.हुबेकर, डॉ.सचिन आंधळकर, डॉ.जयश्री बांगर, मेट्रन संगिता दिंडकर, जितेंद्र देशपांडे, मुकादम नान हजारे आदींची उपस्थिती होती. 

शहरात सध्या ८२ बेड उपलब्ध३० व्हेंटिलेटरची मागणी शासनाकडे केली होती. याला मंजुरी मिळाली आहे. आठवडाभरात ते मिळतील. जर पुढे गरज भासली तर आणखी मागणी करण्यात येईल. शासकीय, खाजगी असे ८२ व्हेंटिलेटर सध्या उपलब्ध आहेत. बीडचे कोव्हीड रुग्णालय पूर्णपणे तयार झाले आहे. वेगवेगळे कक्ष तयार करण्यात आले आहेत.- डॉ.अशोक थोरात, जिल्हा शल्य चिकित्सक, बीड

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसBeedबीड