बीड : आतापर्यंत बीड जिल्ह्यातून १४० कोरोना संशयितांचे स्वॅब प्रयोगशाळेत पाठविले होते. १३७ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. आणखी तिघांचा अहवाल येणे बाकी आहेत.
कोरोना संशयितांसाठी बीड जिल्हा रुग्णालय व अंबाजोगाई स्वाराती रुग्णालयात आयसोलेशन वॉर्ड तयार केलेले आहेत. बीडमध्ये १०० स्वॅब घेतले असून सर्वच निगेटिव्ह आले आहेत. तर अंबाजोगाईत ४० घेतले असून ३७ चा अहवाल प्राप्त झाला आहे. आणखी तीन अहवाल प्रलंबित आहेत. आतापर्यंत आष्टी तालुक्यातील पिंपळा येथे एकमेव कोरोनाग्रस्त रुग्ण आढळला आहे. त्याच्यावर अहमदनगर येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याची नोंदही नगर जिल्ह्यातच आहे, ही माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.बी.पवार यांनी ‘लोकमत’ला दिली.