शहरं
Join us  
Trending Stories
1
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
2
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
3
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
4
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
5
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
6
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
7
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
8
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
9
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
10
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
11
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
12
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
13
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
14
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
15
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
16
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
17
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
18
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
19
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
20
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...

corona virus : विनामास्क फिरल्याने दंड सुनावला; संतप्त तरुणाने तहसीलदार, मुख्याधिकाऱ्यांना केली शिवीगाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 19:14 IST

corona virus : विनाकारण फिरणाऱ्या लोकांची जबरदस्तीने अँटीजन चाचणी करण्याच्या मोहिमेला सोमवारपासून बीड जिल्ह्यात सुरूवात झाली.

ठळक मुद्देविनामास्क फिरणाऱ्या तरूणाला दंडाची आणि अँटीजन टेस्टची केली होती सूचना 

अंबाजोगाई : मास्क न लावता फिरणाऱ्या दुचाकीस्वाराला पथकाने अडविले आणि अँटीजेन चाचणी व दंडाची सूचना केली. यामुळे संतापलेल्या तरूणाने पथकातील अधिकाऱ्यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत चाचणीला विरोध केला. ही घटना अंबाजोगाईतील सावरकर चौकात सोमवारी (दि.०३) सकाळी घडली.

विनाकारण फिरणाऱ्या लोकांची जबरदस्तीने अँटीजन चाचणी करण्याच्या मोहिमेला सोमवारपासून बीड जिल्ह्यात सुरूवात झाली. यासाठी अंबाजोगाई शहरात पाच पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. सकाळी पावणेआठच्या सुमारास अंबाजोगाई बसस्थानकासमोर वेणुताई महिला महाविद्यालयासमोर तहसीलदार विपीन पाटील, मुख्याधिकारी अशोक साबळे, तालुका आरोग्य अधिकारी बालासाहेब लोमटे, महसूल व न.प.चे कर्मचारी, पोलीस हे अँटीजन टेस्ट ड्राईव्हची कार्यवाही करत होते. यावेळी प्रविण राजाभाऊ शेप (रा. शेपवाडी, ता. अंबाजोगाई) हा तरूण विनामास्क त्याच्या दुचाकीवरून (एमएच २० बीबी ९२७३) सावरकर चौकाकडून येत होता. 

पथकाने त्याला अडवून अँटीजन चाचणी आणि विनामास्क असल्याने दंड भरण्याबाबत सुचना केली. त्यामुळे संतापलेल्या प्रविणने सर्व अधिकाऱ्यांना उद्देशून अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली आणि अँटीजन चाचणीला विरोध करत दहशत निर्माण केली. याप्रकरणी रमेश भानुदास सोनकांबळे यांच्या फिर्यादीवरून प्रविण शेप याच्यावर कलम ३५३, ५०४, १८८ सह आपत्कालीन व्यवस्था कायद्यान्वये अंबाजोगाई शहर ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.

२३५ जणांच्या अ‍ॅन्टिजन टेस्ट,११ पॉझिटिव्ह दरम्यान, शहरात विनाकारण रस्त्यावर फिरणार्‍या नागरिकांवर प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. सोमवारी दिवसभरात सहा पथकांनी  रस्त्यावर विनाकारण फिरणार्‍या २३५ जणांच्या अ‍ॅन्टिजन टेस्ट केल्या यात ११ जण पॉझिटिव्ह निघाले आहेत. तर मास्क न वापरणे विविध नियमांचे पालन न करणे अशा विविध नागरिकांवर कारवाई करण्यात आली. या कारवाई पोटी एकाच दिवसात ५५ हजार ५०० रूपयांचा दंड वसुल करण्यात आला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याBeedबीड