शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

Corona Virus : झुंज अपयशी; बीडमध्ये आरोग्य सेविकेचा कोरोनाने मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 12:18 IST

Health worker's death in Beed Civil Hospital due to Corona virus : प्रशासनाकडून श्रद्धांजली : अखेरचा निरोप देताना डॉक्टर, परिचारीका, कर्मचाऱ्यांना अश्रू अनावर

बीड : जिल्हा रूग्णालयातील आरोग्य सेविका अनिता जोगदंड-भोसले यांनी दहा दिवस कोरोनाशी झुंज दिली. परंतू ती अपयशी ठरल्याने रविवारी पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. प्राणाची आहुती देऊन रूग्णसेवा देणाऱ्या सहकाऱ्याला अखेरचा निरोप देताना डॉक्टर, परिचारीका, कर्मचाऱ्यांना अश्रू अनावर झाले होते. अधिकारीही भावूक झाले. अनिता भोसले यांना रूग्णालय प्रशासनाकडून श्रद्धांजलीही अर्पण करण्यात आली.

अनिता भाेसले या स्थलांतरीत जिल्हा रूग्णालयात कर्तव्य बजावत होत्या. २६ मे रोजी त्यांना त्रास जाणवत असल्याने त्यांनी कोरोना चाचणी केली. यात त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे त्यांना तात्काळ कोरोना वॉर्डातील आयसीयू २ मध्ये दाखल करण्यात आले. दहा दिवस त्यांच्यावर फिजिशियन व इतर तज्ज्ञांकडून उपचार सुरू होते. परंतू याला प्रतिसाद मिळाला नाही. अखेर रविवारी पहाटेच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेत जगाचा निरोप घेतला. ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर सकाळपासून रूग्णालय परिसरात कर्मचाऱ्यांनी गर्दी केली. रूग्णवाहिकेतून स्मशानभूमित नेण्यापूर्वी जिल्हा रूग्णालय प्रशासनाकडून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सूर्यकांत गित्ते, अति.जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुखदेव राठोड यांच्यासह मुकादम, परिचारीका, कर्मचारी, आरोग्य सेवक आदी उपस्थित होते.

अमर रहे , अनिता भोसले अमर रहेश्रद्धांजली अर्पण केल्यानंतर रूग्णवाहिका मार्गस्थ होणार एवढ्यात सर्वांनीच अमर रहे अमर रहे, अनिता भोसले अमर रहे, अशा घोषणा केल्या. यामुळे परिसर भावूक झाला होता. सहकारी परिचारीका व आरोग्य सेविकांनी आक्रोश केला. यामुळे अधिकाऱ्यांसह उपस्थिती सर्वच भावूक झाले होते. आगोदरच छाया बहिरे या परिचारीकेला गमावल्यानंतर जिल्हा रूग्णालयाने अनिता भाेसले यांच्या रूपाने दुसरी कोरोना योद्धा गमावली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यूBeed civil hospitalजिल्हा रुग्णालय बीडBeedबीड