बाजारात बहुतांश व्यापारी व ग्राहकांनी मास्क वापरले नसल्याचे दिसून आले. सोशल डिस्टन्स न ठेवता बाजारात गर्दी दिसून आली. याकडे महसूल, नगरपालिका, पोलीस विभागाचे लक्ष नसल्याचे पहायला मिळाले. मागील काही दिवसांपासून कोरोना रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने याला आळा बसावा म्हणून शासनाने अनेक नियम घालून दिलेत. तसेच येथील तहसीलदारांनी शहरातील व तालुक्यातील सर्व व्यापाऱ्यांची तसेच बाजारात येणाऱ्या व्यापाऱ्यांची कोरोना चाचणी करण्याचे आदेश दिले होते. मात्र याला काहीच प्रतिसाद मिळाला नाही. तसेच येथील आठवडी बाजारात बुधवारी कोरोनाच्या नियमांचे पालन होत नसल्याचे दिसून आले. या आठवडी बाजारात भाजीपाला, किराणा, कपडा, चिवड्याची दुकाने, मिरची विक्रीवाले सह अनेक दुकाने लागली होती. मात्र बाजारात येथील एकाही व्यापाऱ्याच्या तोंडाला मास्क नव्हता, तसेच भाजीपाला विक्री करणारे, किराणा विक्रेते, कापड विक्रेत्यांच्या दुकानांमध्येही कोणतेही अंतर दिसत नव्हते. तसेच बाजारात येणाऱ्या तुरळक ग्राहकांना मास्क होते. दरम्यान, याबाबत विचारणा केली असता, बाजारात येणाऱ्या तसेच बाजारातील व्यापाऱ्यांनी नियमाचे पालन करावे अन्यथा त्यांच्यावर कारवाई करणार असल्याचे तहसीलदार सचिन खाडे यांनी सांगितले.
===Photopath===
040321\04bed_8_04032021_14.jpg