शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

श्रीक्षेत्र कपिलधार यात्रा उत्सवास सुरुवात; भाविकांच्या सोयीसाठी बीड जिल्ह्यातून ७५ लालपरी

By अनिल भंडारी | Updated: November 25, 2023 14:19 IST

बीड जिल्ह्यातील सर्व आगारांतून बसचे नियोजन करण्यात आले आहे

बीड : कार्तिक पौर्णिमेनिमित्त श्रीक्षेत्र कपिलधार यात्रेसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या बीड विभागातून ७५ बसचे नियोजन करण्यात आले आहे. २५ ते २७ नोव्हेंबर या यात्रा कालावधीत कार्तिक पौर्णिमेनिमित्त श्रीक्षेत्र कपिलधार येथे यात्रा भरणार आहे. त्या अनुषंगाने मोठ्या प्रमाणात भाविक भक्त महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतून तसेच इतर राज्यांतून श्रीक्षेत्र कपिलधार येथे येतात. त्यांच्या प्रवास सुविधेसाठी रापमच्या बीड विभागाच्या वतीने ७५ बसचे नियोजन करण्यात आलेले आहे.

एसटी बसनेच प्रवास करावा७५ बस कपिलधार मांजरसुंबा ते अंबाजोगाई- परळी-लातूर-अहमदपूर या मार्गांवर धावणार आहेत. प्रवाशांनी, भाविकांनी राज्य परिवहन महामंडळाच्या बसने प्रवास करावा असे आवाहन विभाग नियंत्रक अजयकुमार मोरे, विभागीय वाहतूक अधिकारी संदीप पडवळ यांनी केले.

परळी आगारातून १८ बसचे नियोजनपरळी वैजनाथ येथे भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी तेथून श्री क्षेत्र कपिलधार येथे दर्शनासाठी जातात. प्रवाशांच्या सुविधेसाठी परळी आगारातून अठरा बसचे नियोजन केल्याची माहिती आगार प्रमुख संतोष महाजन यांनी दिली.

पंढरपूर यात्रा सेवेलाही प्रतिसादकार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूर यात्रेसाठी बीड विभागातून ९० बसचे नियोजन केले होते. तर, नारायणगड यात्रेसाठी १३ बसचे नियोजन केले होते. बीड व धारूर आगारातून प्रत्येकी १५, तर परळी, माजलगाव, गेवराई, पाटोदा, आष्टी व अंबाजोगाई आगारातून दहा अशा एकूण ९० बसचे नियोजन केले होते. या बसला भाविकांचा प्रतिसाद मिळाला तसेच रापमच्या उत्पन्नात भर पडली.

आगार- बस संख्याबीड -१०धारूर - १०परळी - १८,माजलगाव -७गेवराई -७पाटोदा -७आष्टी - ५अंबाजोगाई -११एकूण - ७५ 

टॅग्स :Beedबीडstate transportएसटी