शहरं
Join us  
Trending Stories
1
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
2
आजचे राशीभविष्य,०४ नोव्हेंबर २०२५: वडीलधाऱ्यांकडून लाभ, दुपार नंतर प्रतिकूलतेशी तोंड द्यावे लागेल
3
ठाण्यातील दोस्ती कम्पाउंडमधील ८ इमारतींचे पाडकाम सुरू; दीड हजार रहिवाशांचा आक्रोश
4
इंडिया मेरिटाईम वीक-२०२५: ‘जेएनपीए’चे जागतिक स्तरावरील १९ कंपन्यांशी २ लाख काेटींचे करार
5
पाळीव प्राण्यांना सन्मानाने ‘शेवटचा निरोप’; विशेष अंत्यविधी केंद्रांच्या उभारणीलाही सुरुवात
6
अलिबाग-रोहा मार्गावर पूल कोसळला; वाहतूक पूर्ण ठप्प; राेजच्या प्रवाशांचे हाल
7
मुंब्रा दुर्घटना: रेल्वेच्या २ अभियंत्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा; ४ महिन्यांनंतर कारवाई
8
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
9
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
10
मतदारांची दुबार नावे शोधा, त्यांचे दुबार मतदान रोखा! निवडणूक आयोगाने दिले स्पष्ट आदेश
11
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य
12
मुंबई अपहरण प्रकरण: रोहित आर्याचे एन्काउंटर; माजी मंत्री केसरकर यांची हाेणार चौकशी
13
मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
14
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
15
डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही; राज्यभर ओपीडीत रुग्णांची नेहमीप्रमाणेच तपासणी
16
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
17
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
18
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
19
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
20
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर

‘दररोज एकच जिनिंग सुरू ठेवा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2020 23:54 IST

तालुक्यातील पाच शासकीय केंद्रापैकी दररोज एकच कापूस खरेदी केंद्र सुरू ठेवण्याच्या सूचना कापूस उत्पादक पणन खात्याने काढल्या आहेत. या कारभारामुळे शेतकऱ्यांना जिनिंगवर हेलपाटे मारण्याची वेळ आली आहे.

ठळक मुद्देपणन महासंघाची अजब सूचना : कापूस उत्पादक शेतकरी मेटाकुटीला; म्हणे ग्रेडरचा तुटवडा....

पुरुषोत्तम करवा ।लोकमत न्यूज नेटवर्कमाजलगाव : तालुक्यातील पाच शासकीय केंद्रापैकी दररोज एकच कापूस खरेदी केंद्र सुरू ठेवण्याच्या सूचना कापूस उत्पादक पणन खात्याने काढल्या आहेत. या कारभारामुळे शेतकऱ्यांना जिनिंगवर हेलपाटे मारण्याची वेळ आली आहे. त्यांना कापूस खाजगी खरेदीदारांना कमी भावात देण्याची वेळ आली आहे.तालुका कापूस उत्पादनात अग्रेसर असून, भौगोलिक क्षेत्रापैकी ५० टक्के क्षेत्रावर कापसाची लागवड केली जाते. येथील कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत गत अडीच महिन्यात १२ जिनिंगवर ३ लाख ६६ हजार २६२ क्विंटल कापसाची खरेदी झाली आहे. पैकी २ लाख २० हजार २३७ क्विंटल खरेदी ही शासकीय, तर १ लाख ४६ हजार क्विंटल खरेदी खाजगी केंद्रावर झाली आहे. शासकीय केंद्रावर " ५११० ते ५५००, तर खाजगी केंद्रावर " ४७०० ते ५००० या भावाने खरेदी करण्यात येत आहे.माजलगाव तालुक्यात ७ जिनिंगवर कापसाची शासकीय खरेदी होत असून, हे खरेदी केंद्र सुरू होऊन ८० दिवस झाले आहेत. स्टॉकच्या नावावर अचानक खरेदी केंद्र बंद केल्याने केवळ ३५ दिवसच हे केंद्र सुरू असल्याची माहिती येथील बाजार समितीने दिली. कापून उत्पादक पणन महासंघाकडून वारंवार शासकीय खरेदी केंद्र बंद ठेवल्याने शेतकरी हैराण झाला आहे.पणन खात्याने ७ फेब्रुवारी रोजी जारी केलेल्या आदेशात दररोज एकाच शासकीय खरेदी केंद्रावर कापसाची खरेदी करण्याचे सांगितले आहे. वास्तविक पाहता माजलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत १० ते १२ हजार क्विंटलची आवक असून, दररोज ५०० छोटी - मोठी वाहने जिनिंगवर येत आहेत. यापैकी एका जिनींगवर दररोज केवळ १०० वाहनांमधील कापसाचे माप होत आहे. केवळ दोन ते अडीच हजार क्विंटलची कापसाची खरेदी होत आहे. यामुळे शेतकऱ्यांना मापासाठी ८-८ दिवस वाट पहावी लागत आहे. यामध्ये शेतक-यांचे वेळेसोबतच आर्थिक नुकसानही होत आहे.कापूस प्रश्नी चाललेली शेतकºयांची थट्टा प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन थांबवावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

टॅग्स :BeedबीडcottonकापूसFarmerशेतकरी