शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

शिरूर येथे संगणक प्रशिक्षकाचा विद्यार्थिनीवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2020 12:19 IST

याप्रकरणी शिरूर कासार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून महेश नागरे याला अटक करण्यात आली आहे. 

ठळक मुद्देआरोपी शिक्षक विवाहित असून त्याला दोन अपत्य आहेततीन दिवसांची पोलीस कोठडी

शिरूर कासार (जि. बीड) : गुरू शिष्याच्या पवित्र नात्याला काळिमा फासणारी घटना शिरूर कासार येथील कौशल्य संगणक प्रशिक्षण संस्थेत घडली आहे. महेश नवनाथ नागरे या शिक्षकाने विद्यार्थिनीवर बलात्कार  करून शिक्षणक्षेत्राला कलंकित केले आहे. याप्रकरणी शिरूर कासार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून महेश नागरे याला अटक करण्यात आली आहे. 

तालुक्यातील  हनुमानवाडी येथे २८ डिसेंबर रोजी अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराची घटना घडली होती. आता पुन्हा एकदा अत्याचाराची घटना समोर आली आहे. तालुक्यातील ब्रह्मनाथ येळंब येथील राहणारा महेश नवनाथ नागरे याने शिरूर कासार येथील बसस्थानकासमोर कौशल्य कॉम्प्युटर  इन्स्टिट्यूट नावाने संगणक प्रशिक्षण संस्था सुरु  केली. येथे शिक्षक म्हणून तोच शिकवितो. त्याच्या या प्रशिक्षण केंद्रात एक २१ वर्षीय तरूणी संगणक शिक्षणासाठी येत होती. १३ डिसेंबर रोजी साडेअकरा वाजता शिकवणी संपल्यानंतर काही काम असल्याचे सांगून सदर तरूणीला महेश  नागरे याने आपल्या प्रशिक्षण केंद्रातच थांबवून ठेवले. सर्व विद्यार्थी निघून गेल्यानंतर केंद्राचा दरवाजा बंद करुन अत्याचार केला. ही घटना इतरांना सांगितल्यास जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी शिरूर कासार पोलीस ठाण्यात पीडितेने दिलेल्या फिर्यादीवरून शिक्षकाविरूद्ध ४ जानेवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक मनोज बरूरे यांच्याकडे तपास असून जलद गतीने तपास करून आरोपीविरोधात दोषारोपपत्र दाखल केले जाईल असे त्यांनी सांगितले.

आरोपी विवाहित बलात्कार प्रकरणातील आरोपी असलेला संगणक शिक्षक महेश नागरे हा विवाहित आहे. त्यास दोन अपत्ये आहेत. तर पीडित तरूणी अविवाहित आहे. या प्रकाराने शैक्षणिकक्षेत्रात खळबळ उडाली आहे. 

तीन दिवसांची पोलीस कोठडीआरोपी महेश नागरे याला गुन्हा दाखल झाल्याबरोबर अटक करण्यात आली. पोलिसांनी त्याला ५ जानेवारीला न्यायालयात हजर केले असता त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे. 

टॅग्स :Rapeबलात्कारTeacherशिक्षकArrestअटक