शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

बीडमध्ये बंदला संमिश्र प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2020 00:15 IST

केंद्र आणि राज्य शासनाच्या जनविरोधी आर्थिक धोरणाच्या विरोधात राज्यातील विविध विभागातील शासकीय कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी बुधवारी कामबंद आंदोलन करून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.

ठळक मुद्देजिल्हाधिकारी कार्यालयावर विविध संघटनेच्या वतीने भव्य मोर्चा : कार्यालय, शाळांमध्ये शुकशुकाट

बीड : केंद्र आणि राज्य शासनाच्या जनविरोधी आर्थिक धोरणाच्या विरोधात राज्यातील विविध विभागातील शासकीय कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी बुधवारी कामबंद आंदोलन करून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. दरम्यान जिल्हाभरात स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने आंदोलन झाले, तर ग्रामीण भागात भारत बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला.सरकारच्या धोरणामुळे दिवसेंदिवस सामान्य जनतेचे जगणे अवघड होत आहे. किमान वेतन कायद्याची अंमलबजावणी करावी, समान काम समान वेतन द्यावे, देशभर जुनी पेंशन योजना लागू करावी, अर्धवेळ, ठोक वेतन, सामाजिक सुरक्षितता निर्माण करावी, कामगार कायद्यामध्ये करण्यात येणारे कामगार विरोधी अन् मालकाधार्जिणे बदल त्वरीत थांबवावेत, यासह इतर मागण्यांसाठी विविध शासकीय कर्मचारी संघटनेतर्फे जिल्हाभरात आंदोलन करण्यात आले.दरम्यान कामगार-कर्मचारी-शिक्षक समन्वय समिती, एआयटीयूसी, सीटू, राज्य कर्मचारी मध्यवर्ती संघटना, मराठवाडा शिक्षक संघ, बँक फेडरेशन, विमा आणि जनरल विमा फेडरेशन, इंटक, एचएमस असंघटीत मजदूर पंचायत, पी अ‍ॅन्ड टी कर्मचारी युनियन, हमाल मापाडी युनियन, लालबावटा शेतकरी संघटना, यासह इतर संघटनांनी जिल्हाभरात आंदोलन केले. तसेच संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी हजारोच्या संख्येने विविध संघटनेच्या कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता.विद्यार्थी संघटनेच्या पदाधिका-यांवर गुन्हे दाखलबीड येथे एसएफआयच्या वतीने शैक्षणिक बंदचे आवाहन करण्यात आले होते. यावेळी शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात आंदोलन करण्यासाठी एसएफआय संघटनेचे पदाधिकारी गेले होते.यावेळी त्यांनी कॉलेज बंद करण्याचे आवाहन केले. परंतु पोलिसांच्या माहितीनुसार या आंदोलनाची परवानगी संघटनेने घेतली नव्हती. तरी देखील आंदोलन करण्याचा प्रयत्न केला.याप्रकरणी मोहन माणिक जाधव, दत्ता बाबासाहेब प्रभाळे, रोहिदास शेकू जाधव, दत्ता सीताराम भोसले, गोपीनाथ बन्सी गायकवाड, प्रकाश नवनाथ उजगरे यांच्यावर पेठ बीड पोलीस ठाण्यात बेकायदेशीर आंदोलन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :BeedबीडStrikeसंपagitationआंदोलन