शहरं
Join us  
Trending Stories
1
खबरदार! समर्थन कराल तर १० टक्के अतिरिक्त टॅरिफ वसूल करू; डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी, कारण काय?
2
१० मिनिटांत डिलिव्हरी हाच मोठा स्कॅम! एक्सपायरी झालेले प्रॉडक्ट, तुटलेले बॅडमिंटन रॅकेट; हातात देतात आणि पळतात...
3
Palghar Rains: पालघरमध्ये आज पावसाचा रेड अलर्ट; जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी!
4
भारतीयांसाठी आनंदाची बातमी! 'युएई'ने सुरू केला विशेष व्हिसा; काय आहे संपूर्ण प्रक्रिया? जाणून घ्या
5
आणखी एक सोनम रघुवंशी! आसिफच्या प्रेमात पडलेल्या दिशानं नवऱ्याला संपवलं, बेडवरच घेतला जीव
6
FD-RD विसरून जाल, LIC ची ही 'कन्यादान' स्कीम आहे जबरदस्त; मुलीच्या लग्नाच्या वेळी मिळतील २७ लाख
7
"मराठी बोलत नाही, दम असेल तर...", भोजपुरी अभिनेत्याचं थेट राज ठाकरेंना चॅलेंज
8
ढोंगी पाकिस्तान! ज्या सैनिकाला ओळखही दाखवायला तयार नव्हते, त्यालाच दिला शहीदाचा दर्जा; आता म्हणतात... 
9
ट्रम्प ठरवणार आज शेअर बाजारात काय होणार?
10
Daily Horoscope: प्रमोशन आणि पैसा दोन्ही मिळण्याचा योग; वाचा आजचे राशीभविष्य
11
कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी नवी अट; डिजिटल कोर्स उत्तीर्ण होणे आवश्यक
12
महाराष्ट्रधर्म थांबलाच नाही, साखळी कधी तुटली नाही ! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ‘महाराष्ट्रधर्म’ विशेष पॉडकास्टचा प्रारंभ
13
Ashadhi Ekadashi 2025: आषाढीच्या दुसर्‍या दिवशी घेतात शिळ्या विठोबाचे दर्शन; कारण...
14
रेल्वे इंजिन घसरल्याने हार्बर मार्गावर खोळंबा; पनवेलला जाणाऱ्या लाेकल साडेचार तास ठप्प
15
भारतीय तरुणांना नशेत बुडविण्याचे कारस्थान
16
मी मराठीतूनच शिकलो, मातृभाषेतून शिकल्याने विषयांची समज पक्की होते; सरन्यायाधीश भूषण गवई
17
छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा ‘सीए’त टॉपर; सीए फायनलचा निकाल जाहीर, मुंबईचा मानव शाह देशात तिसरा
18
ठाकरेंच्या एकतेमुळे मविआची एकता धोक्यात? काँग्रेसचा बदलला सूर; वेगळ्या चुलीची शक्यता
19
मतदारयाद्या पुनरावलोकनाच्या काही नियमांत सूट; बिहार निवडणूक; आता बीएलओंवर जबाबदारी
20
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...

जलयुक्त, शेततळ्याची कामे मुदतीत पूर्ण करा-सिंह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 00:23 IST

जलयुक्त शिवार अभियानातील कामे तसेच मागेल त्याला शेततळे योजनेचे यंत्रणांना दिलेले कामाचे उद्दिष्ट दिलेली कामे मुदतीत पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांनी संबधित अधिका-यांना दिल्या.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : जलयुक्त शिवार अभियानातील कामे तसेच मागेल त्याला शेततळे योजनेचे यंत्रणांना दिलेले कामाचे उद्दिष्ट दिलेली कामे मुदतीत पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांनी संबधित अधिका-यांना दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांच्या अध्यक्षतेखाली जलयुक्त शिवार अभियान व मागेल त्याला शेततळे योजनेच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी बोलत होते.या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त उपमुख्य कार्यकारी अधिकारी धनराज निला, उपजिल्हाधिकारी महेंद्र कुमार कांबळे, उपविभागीय अधिकारी प्रियंका पवार, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी विष्णू मिसाळ यांची प्रमुख उपस्थिती होती.

२०१५-१६ पासून जलयुक्त शिवार अभियानातंर्गत तीन टप्यात ७२२ गावांची निवड करण्यात आली असून टप्पा क्र. १ अंतर्गत निवड केलेल्या २७१ गावांमधील कामे पूर्ण झालेली आहेत. टप्पा क्र. २ मध्ये २०१६-१७ मध्ये जिल्ह्यातील २५६ गावांची निवड करण्यात आली असून गावातील कामांचा कालावधी २०१८ मार्च अखेर समाप्त होणार आहे. यामध्ये विविध यंत्रणाची एकूण ५०७३ कामे प्रस्तावित करण्यात आली असून जानेवारी २०१८ अखेर ३४४३ कामे पूर्ण करण्यात आली आहेत.

याकामामध्ये बांधबंदिस्ती, खोल समतल चर, माती नाला बांध, पाझर तलाव, गांव तलाव, सिंचन तलाव दुरुस्ती, सिंमेट नाला बांध व माती नाला बांध दुरुस्ती, पुनरुज्जीवन, शेततळी, जलस्त्रोतातील गाळ काढणे इत्यादी कामांचा समावेश असून उर्वरित कामे मार्च- २०१८ अखेर पूर्ण करण्याच्या दृष्टीने त्यांचे नियोजन व कालबध्द कार्यक्रमाबाबत तालुकानिहाय व क्षेत्रीय कर्मचारी निहाय जिल्हाधिकरी एम.डी. सिंह यांनी सविस्तर आढावा घेवून प्रलंबित कामे मार्च २०१८ अखेर पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी अंमलबजावणी यंत्रणांना केल्या.

यावेळी जिल्हाधिकारी एम. डी सिंह यांनी टप्पा क्र. ३ मध्ये २०१७-१८ साठी जिल्ह्यातील एकूण १९५ गावांची निवड करण्यात आली असून विविध यंत्रणांची एकूण ३३८५ कामे आराखडयात प्रस्तावित करण्यात आली आहेत. एकूण आराखडा १३९.८१ कोटी रुपयाचा आहे. टप्पा क्र. तीन मध्ये बांधबंदिस्ती, खोल समतल चर इत्यादी क्षेत्र उपचाराची कामे ८९२६५ या क्षेत्रावर प्रस्तावित करण्यात आलेली आहेत. तसेच माती नाला बांध, अर्दन स्ट्रक्चर, सिंमेट नाला बांध, पाझर तलाव, गाव तलाव, कोल्हापुरी बंधारा, सिंचन तलाव दुरुस्ती, सिंमेट नाला बांध व माती नाला बांध दुरुस्ती, पुनरुज्जीवन शेततळी, वनविभागामार्फत वनतळी, गुरे प्रतिबंधक चर जलस्त्रोतातील गाळ काढणे इत्यादी कामांचा समावेश आहे. ही कामे पूर्ण करण्यासाठी कालबध्द कार्यक्रम तयार करावे कामांची सविस्तर अंदाजपत्रके तयार करुन त्यास प्रशासकीय मान्यता घेऊन निविदा प्रक्रियेची कार्यवाही सुरु करावी अशा सूचना त्यांनी केल्या.

तसेच मागेल त्याला शेततळे कार्यक्रमातंर्गत जिल्ह्यात ६ हजार ५०० शेततळे उभारण्याचे उदिष्ट देण्यात आले आहे. एकूण १२ हजार ३१२ शेतकºयांनी आॅनलाईन पध्दतीने अर्ज सादर केले असून ७ हजार ९०३ शेतकºयांना कामे करण्यासाठी कार्यारंभ आदेश दिले आहेत. १५ फेब्रुवारी अखेर एकूण ३ हजार ७५४ शेततळयाची कामे पूर्ण झाली असून ५२६ कामे प्रगती पथावर असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विष्णू मिसाळ यांनी दिली. या बैठकीस जिल्हा व तालुकास्तरीय समितीचे सदस्य, यंत्रणेचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.