शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

बीड जिल्ह्यातील १०३१ ग्रामपंचायतींच्या ३३२९ प्रभागांची स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2018 00:31 IST

संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान ग्रामपंचायत स्तरावरील प्रभाग वॉर्ड स्पर्धा १५ ते २७ आॅक्टोबरदरम्यान रंगणार आहे. जिल्ह्यातील १०३१ ग्रामपंचायतींच्या ३३२९ प्रभागांमध्ये ही स्पर्धा होत आहे. या स्पर्धेच्या तपासणी समितीमध्ये १५ सदस्यांचा समावेश करण्यात आला असून प्रत्येक ग्रामपंचायत निहाय १०३१ समित्या स्थापन केल्या आहेत.

ठळक मुद्देसंत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान : दोन आठवडे करणार १०३१ समित्या परीक्षण

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान ग्रामपंचायत स्तरावरील प्रभाग वॉर्ड स्पर्धा १५ ते २७ आॅक्टोबरदरम्यान रंगणार आहे. जिल्ह्यातील १०३१ ग्रामपंचायतींच्या ३३२९ प्रभागांमध्ये ही स्पर्धा होत आहे. या स्पर्धेच्या तपासणी समितीमध्ये १५ सदस्यांचा समावेश करण्यात आला असून प्रत्येक ग्रामपंचायत निहाय १०३१ समित्या स्थापन केल्या आहेत.संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान ग्रामपंचायत स्तरावर होणाऱ्या तपासणी दरम्यान सुंदर चांगल्या वॉर्डाची घोषणा होणार आहे. या स्पर्धेत प्रथम येणाºया वार्डसाठी दहा हजार रुपये पारितोषिक शासनाकडून देण्यात येणार आहे.प्रत्येक जिल्हा परिषद गटात पालक अधिकारी यांना तपासणी समितीचे अध्यक्ष म्हणून नियुक्त केले आहेत. तर ग्रामसभा संपर्क अधिकारी यांना प्रत्येक ग्रामपंचायतींचे सदस्य सचिव म्हणून काम पहावयाचे आह. जिल्ह्यात साठ जिल्हा परिषद गटात साठ तपासणी समिती अध्यक्ष नियुक्ती केले असून ३३२९ ग्रामसभा संपर्कअधिकारी सदस्य सचिव म्हणून जबाबदारी पार पडणार आहेत.समितीमध्ये सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, पाणीपुरवठा समिती, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष, मुख्याध्यापक, आशा कार्यकर्ती, अंगणवाडी कार्यकर्ती, रोजगार सेवक, ग्रामपंचायतीचे संगणक परिचालक, पाणीपुरवठा कर्मचारी, बचत गटाचे अध्यक्ष, स्वच्छाग्रही हे त्यांच्या गावातील ग्रामस्थ तपासणी समितीचे सदस्य असणार आहेत. या समितीच्या मदतीने गावातील प्रभागाची तपासणीचा उपक्रम सुरू करणार असून या संदर्भात सर्व पंचायत समिती अंतर्गत कार्यशाळा पार पडली आहे.सर्व ग्रामपंचायतींमध्ये एकाच वेळी ही स्पर्धा होणार असल्याने ग्रामस्थांनी पाणीपट्टी वसुली, शौचालय व वापर, घनकचरा सांडपाणी व्यवस्थापन, तसेच लोकसहभागातील कामे याबाबत पुढाकार घेऊन तपासणी समितीस सहकार्य करावे व प्रभागाच्या प्रमुखांनी सदर समितीसमोर आपल्या प्रभागाचे सादरीकरण करावे असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे व उपमुख्य कार्यकारी अधिकारी मधुकर वासनिक यांनी केले आहे.प्रभागाला १० हजाराचे बक्षीसप्रथम आलेल्या प्रभागासाठी दहा हजार रुपयांचे पारितोषिक मिळणार असून सदर पारितोषिकाची रक्कम त्याच प्रभागासाठी खर्च होणार आहे . जिल्ह्यासाठी एकूण दहा लक्ष तीस हजार रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे.

टॅग्स :Beedबीडzpजिल्हा परिषदgram panchayatग्राम पंचायत