शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रकुल पदक विजेत्या अविनाशला आर्थिक मदत मिळावी; आईवडिलांची राज्य शासनाकडे मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2022 17:13 IST

आई, वडील यांनी केली महाराष्ट्र राज्य शासनाकडे लेखी पत्राद्वारे मागणी 

- अविनाश कदमआष्टी (बीड) : तालुक्यातील मांडवा येथील आंतरराष्ट्रीय खेळाडू अविनाश साबळेने बर्मिंगहॅम येथील राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत ३ हजार मीटर स्ट्रिपलचेस शर्यतीत नव्या राष्ट्रीय विक्रमासह रोप्यपदक ( सिल्वर पदक) पदकाची कमाई करून देशाचा गौरव वाढवला आहे. दरम्यान, इतर राज्याप्रमाणे अविनाशला देखील आर्थिक मदत देण्याची मागणी त्याच्या आईवडिलांनी राज्यशासनाकडे एका निवेदनामार्फत केली आहे.

अविनाश साबळेने कठीण परिस्थितीवर मात करत अनेक स्पर्धांमध्ये विजय मिळवला आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये चमक दाखवत त्याने अनेक विक्रम देखील आपल्या नावे केली आहेत. नुकतेच त्याने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमध्ये रौप्यपदकाची कमाई केली आहे. बीड जिल्हाधिकारी बिनोद शर्मा यांनी गुरुवारी मांडवा गावी जाऊन अविनाशच्या आईवडिलांचा सत्कार केला. दरम्यान, आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने इतर राज्याप्रमाणे महाराष्ट्र शासनाने देखील आंतरराष्ट्रीय स्तरावर पदक मिळवणाऱ्या खेळाडूंना प्रोत्साहनपर अनुदान देण्यात यावे, अशी मागणी अविनाशच्या आई-वडिलांनी राज्य शासनाकडे केली आहे.

या मागणीचे निवेदन वडिल मुकुंद साबळे, आई वैशाली साबळे, भाऊ योगेश साबळे यांनी तहसिलदार विनोद गुंडमवार यांच्याकडे दिले आहे. मांडवा ग्रामस्थांनी देखील इतर राज्यांप्रमाणे अविनाशला भरघोस आर्थिक मदत मिळावी अशी मागणी केली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर पदक मिळवणाऱ्या खेळाडूंना महाराष्ट्राच्या तुलनेत इतर राज्यांमध्ये प्रोत्साहनपर प्रथम क्रमांक तीन करोड रुपये, द्वितीय क्रमांक दोन करोड आणि तृतीय क्रमांक एक करोड अशी आर्थिक मदत दिली जात असल्याची माहिती आहे. 

मागणीची दखल घेऊन जिल्हाधिकारी यांच्याकडे पत्र पाठविण्यात आले आहे. - विनोद गुंडमवार, तहसीलदार, आष्टी

तात्काळ दखल घेऊन राज्य शासनाकडे मदतीच्या मागणीचा प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे. - राधा बिनोद शर्मा, जिल्हाधिकारी बीड

टॅग्स :BeedबीडBeed collector officeजिल्हाधिकारी कार्यालय बीड