शहरं
Join us  
Trending Stories
1
MHT CET Exam Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये २२ जण अव्वल!
2
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
3
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
4
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
5
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
6
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
7
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
8
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
9
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
10
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 
11
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
12
विकीने दुसऱ्याच अभिनेत्रीचा पकडला हात, अंकिताचा रागराग; Video व्हायरल
13
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
14
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
15
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
16
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
17
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
18
'सगळे या..सगळे या...', मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
20
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'

परळी नगरपालिकेत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा राडा; कर्मचाऱ्यास कॅबिनमध्ये घुसून मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2024 18:38 IST

या प्रकाराने परळी नगरपालिकेतील कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे

परळी (बीड) : प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांचा हप्ता का जमा करत नाहीस असे म्हणून येथील नगरपालिकेच्या कार्यालयातील घरकुल विभागात कार्यरत कर्मचारी सिद्धार्थ गायकवाड यांना आज सकाळी 11.45 वाजता राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या ( अजित पवार)  माजी नगरसेवकाने जातीयवाचक शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. यावेळी त्यांच्या सोबतच्या कार्यकर्त्यांनी कर्मचाऱ्यास कॅबिनमध्ये घुसून मारहाण केली. या प्रकाराने संतप्त कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केले. दरम्यान,  याप्रकरणी गायकवाड यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात माजी नगरसेवक अन्वर मिस्किन शेख यांच्यासहित तिघांच्याविरुद्ध दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला.

परळी शहरातील पेठ मोहल्ला, राहुल नगर, कुरेशी नगर येथील घरकुल आवास योजनेच्या लाभार्थ्यांना घरकुले मंजूर झाली परंतु त्याचा  हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झाला नाही. याचा जाब विचारण्यासाठी  परळीतील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) माजी नगरसेवक अन्वर मिस्कीन व  काही कार्यकर्ते परळी  नगरपालिकेत आले. उपमुख्यअधिकारी यांच्या टेबल जवळ बसले तेथेच  नपचे घरकुल विभागातील कर्मचारी गायकवाड आणि माजी नगरसेवक तसेच सोबतच्या कार्यकर्ते यांच्यात शाब्दिक चकामक झाली. त्यानंतर कार्यकर्ते आक्रमक होऊन घरकुल विभागाचे इन्चार्ज अधिकारी सिद्धार्थ गायकवाड यांच्या अंगावर धावून गेले. यावेळी काही कार्यकर्त्यांनी त्यांना मारहाण ही केली. 

वाद वाढल्याचे पाहून परळी नगरपालिकेचे उपमुख्य अधिकारी संतोष रोडे, नाव नोंदणी विभागाचे किरण उपाडे व जन्म नोंद विभागाचे श्री विकास जगतकर यांनी मध्यस्थी करत माजी नगरसेवकासह कार्यकर्त्यांना आवर घातला. कर्मचाऱ्यास मारहाण झाल्याच्या प्रकारावर संताप व्यक्त करत नगरपालिका कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केले. तसेच शहर पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यासाठी धाव घेतली आहे. 

दरम्यान, कर्मचारी सिद्धार्थ भारत गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून माजी नगरसेवक अन्वर शेख, शेख अजिज इस्माईल, शहबाज सज्जाद बेग यांच्या विरोधात शासकीय कामात अडथळा आणून जातिवाचक शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचां गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाच्या तपास उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरू हे करीत आहेत. घटनास्थळास परळी शहरचे पोलीस निरीक्षक रघुनाथ नाचन , सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन गट्टूवर यांनी भेट दिली आहे.

कर्मचाऱ्याने उद्धट उत्तरे दिल्याने वादपेठ मोहल्ला व अन्य भागातील लाभार्थ्यांना घरकुलाच्या हप्त्याची रक्कम गेल्या दीड महिन्यापासून जमा करण्यात आली नाही. त्यामुळे आपण उपमुख्याधिकारी संतोष रोडे यांच्याकडे पाठपुरावा केला. आज नगरपालिकेत आलो असता घरकुल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी उद्धट उत्तरे दिली. त्यामुळे कार्यकर्त्यात व कर्मचाऱ्यात वाद झाला. - अन्वर मिस्कीन माजी नगरसेवक परळी

टॅग्स :BeedबीडCrime Newsगुन्हेगारी