बीड : शहरात ईईएसएल (इनर्जी इफिसिएन्सी सर्व्हीस लिमिटेड) प्रकल्पांतर्गत बीड शहरात सर्वत्र एलईडी दिवे बसविण्यात आले आहेत. याचे काम पूर्ण झाले आहे. हद्दवाढ व इतर भागातील जास्तीचा सर्वे करण्यात आला असून या भागातही लवकरच हे दिवे बसविले जाणार आहेत. बीड पालिकेने योग्य नियोजन केल्याने शहरातील ११ हजार २० खांबांवर एलईडी बसल्या आहेत. या दिव्यांमुळे विजेची ५० टक्के बचतही होणार आहे.शहरात साधारण जुलै-आॅगस्ट २०१८ मध्ये बीड पालिकेने सर्वेक्षण करून खांबांची माहिती घेतली होती. ही माहिती विद्यूत विभागाने जमा करून केंद्र शासनाकडे दिली. ईईएसल प्रकल्पांतर्गत सर्वेक्षणात आढळलेल्या ११ हजार २० खांबावर ईलईडी दिवे बसविण्याची परवानगी मिळाली. त्याप्रमाणे नोव्हेंबरमध्ये या कामाला प्रत्यक्षात सुरूवात होऊन आॅगस्ट अखेर ते पूर्णही झाले आहे. यामुळे शहरात सध्या उच्च दाबाने रस्त्यांवर प्रकाश दिसत आहे.मुख्याधिकारी रोहिदास दोरकुळकर यांच्या मार्गदर्शनखाली विद्यूत अभियंता कोमल गावंड, दत्ता व्यवहारे, आवचार, राजेंद्र इनकर आदी कर्मचारी काम पाहत आहेत.१५०० पथदिवे नादुरूस्त११ हजार पैकी जवळपास दीड हजार पथदिवे वेगवेगळ्या कारणांनी नादुरूस्त झाले आहेत. त्याची दुरूस्ती करण्याचे आदेश मुख्याधिकाऱ्यांनी संबंधितांना दिले आहेत. याचा सर्व खर्च हे संबंधित कंपनी करीत आहे.
११ हजार ‘एलईडी’मुळे बीड शहर प्रकाशमय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2019 00:14 IST
शहरात ईईएसएल (इनर्जी इफिसिएन्सी सर्व्हीस लिमिटेड) प्रकल्पांतर्गत बीड शहरात सर्वत्र एलईडी दिवे बसविण्यात आले आहेत.
११ हजार ‘एलईडी’मुळे बीड शहर प्रकाशमय
ठळक मुद्देईईएसएल प्रकल्प : ५० टक्के विजेची होणार बचत; बीड पालिकेचे नियोजन