शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

बीडमध्ये २५३ आरोग्य उपकेंद्रात येणार ‘सीएचओ’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2020 23:46 IST

जिल्ह्यातील प्रत्येक आरोग्य केंद्रात आता समुदाय आरोग्य अधिकारी (कम्यूनिटी हेल्थ आॅफिसर) नियूक्त करण्यात येणार आहेत.

ठळक मुद्देभरती गतिमान : आरोग्य विभागाकडून कागदपत्रांची छाननी सुरू

बीड : जिल्ह्यातील प्रत्येक आरोग्य केंद्रात आता समुदाय आरोग्य अधिकारी (कम्यूनिटी हेल्थ आॅफिसर) नियूक्त करण्यात येणार आहेत. त्यादृष्टीने सध्या भरती प्रक्रिया गतीमान करण्यात आली असून कागदपत्रांची पडताळणी सुरू आहे. निवड झाल्यावर सहा महिन्यांचे प्रशिक्षण पूर्ण करून ते प्रत्यक्षात काम करणार आहेत. यामुळे सामान्यांना तत्पर आरोग्य सुविधा मिळण्यास मदत होणार आहे.बीड जिल्ह्यात सध्या तीन उपजिल्हा रुग्णालये, ११ ग्रामीण रुग्णाालये, ५१ प्राथमिक आरोग्य केंद्र, २९४ आरोग्य उपकेंद्र आहेत. ज्या ठिकाणी उपजिल्हा, ग्रामीण व प्राथमिक आरोग्य केंद्र आहे आणि त्याच गावात उपकेंद्र असेल तर तेथे सीएचओ नियुक्ती केले जाणार नाही. संलग्न असलेल्या २५३ आरोग्य उपकेंद्रात ही पदे भरली जाणार आहेत. २५३ जागांसाठी ७९६ अर्ज आले होते. पैकी ७२६ उमेदवार परीक्षेसाठी पात्र ठरले. २ फेब्रुवारी रोजी लातूर येथे परीक्षा घेण्यात आली. यात ६०१ उमेदवारांनी परीक्षा दिली आहे. २२ पेक्षा जास्त गुण असणाऱ्या उमेदवारांना बोलावण्यात आले असून सध्या कागदपत्रांची पडताळणी सुरू आहे. यासाठी चार पथकांची नियूक्तीही करण्यात आली आहे.सर्व प्रक्रिया पूर्ण होताच सर्वांचे समुपदेशन केले जाईल. नियूक्त झालेल्यांना सहा महिन्यांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. बीड जिल्ह्यातील केज, बीड व परळी येथे १८० उमेदवारांना प्रशिक्षण दिले जाईल. राहिलेल्या. ७३ उमेवारांना इतर जिल्ह्यात प्रशिक्षणासाठी पाठविले जाईल. त्यांचे वेतन २५ हजार एवढे राहणार असून कामानुसार पुढील १५ हजार रूपये वाढविले जाणार असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.बी.पवार, अति.जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सचिन शेकडे आदी पथके कागदपत्रांची पडताळणी करीत आहेत.‘सीएचओं’ची काय मदत होणार ?उपकेंद्रातील सीएचओ हे घरोघरी जावून आजारांची माहिती घेणे, प्रथमोपचार करणे, गर्भवती मातांची नोंदणी करणे, शासनाच्या विविध योजनांची माहितीचा प्रचार व प्रसार करणे, आरोग्य केंद्र व नागरिक यांच्यातील दुआ म्हणून काम करणार आहेत.विविध १३ कामांमधून त्यांची १५ हजार रूपये वेतन वाढणार आहे. यामुळे सामान्यांना तत्पर व दर्जेदार उपचार मिळणार आहेत.

जिल्ह्यातील २५३ आरोग्य उपकेंद्रात प्रत्येककी एक असे समुदाय आरोग्य अधिकारी नियूक्त केले जाणार आहेत. सध्या कागपत्रांची पडताळणी सुरू आहे. पात्र उमेदवारांना प्रशिक्षणासाठी पाठविले जाईल. लवकरच ही प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल.- डॉ.आर.बी.पवारजिल्हा आरोग्य अधिकारी, बीड

टॅग्स :BeedबीडHealthआरोग्यhospitalहॉस्पिटल