शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

घरासमोर खेळणाऱ्या चिमुकलीस बसने चिरडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2019 00:02 IST

घरासमोर खेळत असलेल्या चार वर्षीय चिमुकलीला रा.प.मच्या बसने धडक दिली. यामध्ये चिमुकली समोरच्या चाकाखाली आल्याने जागीच ठार झाली.

परळी : घरासमोर खेळत असलेल्या चार वर्षीय चिमुकलीला रा.प.मच्या बसने धडक दिली. यामध्ये चिमुकली समोरच्या चाकाखाली आल्याने जागीच ठार झाली. ही घटना परळीत तालुक्यातील मांडखेल येथे रविवारी सायंकाळी घडली. याप्रकरणी बसचालकाविरुद्ध परळी ग्रामीण ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.स्वरा वाव्हुळे (वय ४ वर्ष, रा. मांडखेल ता.परळी) असे मयत चिमुकलीचे नाव आहे. रविवारी चार वाजता स्वरा ही घरासमोरील अंगणात खेळत होती. याच दरम्यान परळी-मोहा (एमएच २० बीएल ००६७) बस घरासमोरुन जात होती. मुलगी खेळत असताना अचानक बससमोर आली. यामध्ये समोरील चाकाखाली चेंगरुन तिचा मृत्यू झाला. या घटनेने कुटुंबियांनी एकच आक्रोश केला. दरम्यान मुलीचे आजोबा लिंबाजी रामभाऊ वाव्हुळे यांच्या फिर्यादीवरून बसचालक दगडू किरवले (रा. नाथ्रा ता. परळी) विरुद्ध ग्रामीण ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी बससह चालकास ताब्यात घेतले आहे. तपास सहायक फौजदार जाधवर हे करीत आहेत.

टॅग्स :BeedबीडAccidentअपघातDeathमृत्यू