शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

लसिकरणानंतर चिमुकलीचा मृत्यू प्रकरण; डॉक्टर म्हणतात, घटना लसीमुळे नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2018 11:28 IST

शहरातील नऊ महिन्याच्या चिमुकलीचा गोवर - पेन्टा लस दिल्यानंतर दुसर्‍या दिवशी मृत्यू झाला. याप्रकरणी शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाला असला तरी मृत्यूचे कारण स्पष्ट झालेले नाही. दरम्यान, चौकशीसाठी समिती नियुक्ती केली असून, व्हिसेरा राखून ठेवलेला आहे.

ठळक मुद्देपरळी शहरातील वडसावित्री नगरातील निकिता नंदू जाधव या नऊ महिन्याच्या चिमुकलीस गोवर पेन्टा लस शनिवारी देण्यात आली होती. रविवारी सकाळी तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी तिच्या नातेवाईकांनी उप जिल्हा रुग्णालयात धाव घेऊन कारवाईची मागणी केली होती.ही घटना सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर रविवारी सुरु असलेल्या विशेष पल्स पोलिओ मोहिमेवर परिणाम झाला.

परळी (बीड ) : शहरातील नऊ महिन्याच्या चिमुकलीचा गोवर - पेन्टा लस दिल्यानंतर दुसर्‍या दिवशी मृत्यू झाला. याप्रकरणी शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाला असला तरी मृत्यूचे कारण स्पष्ट झालेले नाही. दरम्यान, चौकशीसाठी समिती नियुक्ती केली असून, व्हिसेरा राखून ठेवलेला आहे. ही घटना सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर रविवारी पल्स पोलिओ मोहिमेवर कमालीचा परिणाम झाला असला तरी या घटनेचा पल्स पोलिओ मोहिमेशी काहीही संबंध नाही असे प्रशासनातर्फे सांगण्यात आले आहे.

परळी शहरातील वडसावित्री नगरातील निकिता नंदू जाधव या नऊ महिन्याच्या चिमुकलीस गोवर पेन्टा लस शनिवारी देण्यात आली होती. रविवारी सकाळी तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी तिच्या नातेवाईकांनी उप जिल्हा रुग्णालयात धाव घेऊन कारवाईची मागणी केली होती. पोलिसांनी समजूत काढल्यानंतर स्वाराती रुग्णालयात शवविच्छेदनासाठी निकिताचा मृतदेह पाठविण्यात आला होता. ही घटना सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर रविवारी सुरु असलेल्या विशेष पल्स पोलिओ मोहिमेवर परिणाम झाला.

या घटनेनंतर आरोग्य विभाग जागा झाला. शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा होती. अहवाल आला मात्र या अहवालातून निकिताच्या मृत्यूच्या कारणाचा नेमका निष्कर्ष काढता आलेला नाही. त्यामुळे या प्रकरणी चौकशी समिती नेमण्यात आली आहे. निकिताला इंजेक्शन दिलेल्या भागाची त्वचा आणि रक्ताचे नमुने घेण्यात आले आहेत. तसेच व्हिसेरा राखीव ठेवलेला आहे. न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळेत (फॉरेन्सिक लॅब) हे नमुने पाठविले जाणार आहेत.

लसीची होणार तपासणीपरळीतील या घटनेची माहिती आरोग्य विभागाच्या वरिष्ठांना दिली आहे. तसेच शनिवारी दिलेल्या गोवर - पेन्टा लस वापरु नये अशा सूचना जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेला देण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर ही लस औषध प्रशासनाकडे तपासणीसाठी दिली आहे.

पल्स पोलिओला शहरात फटकानिकिता जाधव हिला शनिवारी गोवर - पेन्टा लस दिली होती. रविवारी तिचा मृत्यू झाला. योगायोगाने रविवारी पल्स पोलिओ मोहिमेचा पहिला टप्पा जिल्हाभरात राबविण्यात आला. परंतु निकिताचा मृत्यू लसीमुळे झाल्याची माहिती सोशल मीडियावरुन मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाल्याने अनेक पालकांनी दक्षता घेत त्यांच्या पाल्यांना पोलिओ डोस पाजण्याचे टाळले. ग्रामीण भागात आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका आणि ग्रामस्थ यांच्यात समन्वय असल्याने पल्स पोलिओ मोहीम चांगल्या प्रमाणात यशस्वी झाली आहे. शहरी भागात मात्र या मोहिमेला चांगला फटका बसला.

४१ हजार बालके अद्यापही पोलिओ डोसपासून वंचितजिल्ह्यात एकूण २ लाख ८९ हजार ५३४ बालकांना पोलीओ डोस देणे अपेक्षीत होते. पैकी २ लाख ४८ हाजर २९० बालकांना डोस दिले असून अद्यापही ४१ हजार २४४ बालके डोस पासून वंचित आहेत. याची टक्केवारी ८५.७६ एवढी आहे. सर्व बालकांना गृहभेटीच्या वेळी पोलीओ डोस देण्यात यावा  व बालकांचे आरोग्य अबाधित राखावे, असे आवाहन जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी केले आहे. 

काही प्रमाणात परिणाम झालामुलीचा झालेला मृत्यू आणि पल्स पोलिओ मोहिमेतील लसीचा काहीही संबंध नसताना संभ्रम निर्माण झाल्याने पल्स पोलिओ मोहिमेवर काही प्रमाणात परिणाम झाला. पालकांनी त्यांच्या ० ते ५ वयोगटातील वंचित बालकांना पोलिओ लस पाजण्यासाठी सहकार्य करावे यासाठी शहरी भागात आरोग्य कर्मचारी घरोघरी जाऊन सर्वेक्षण करुन पोलिओ लस देणार आहेत. तसेच अहवाल आल्यानंतर परळीतील मृत्यूचे कारण स्पष्ट होईल.- डॉ. अशोक थोरात, जिल्हा शल्य चिकित्सक, बीड

टॅग्स :Healthआरोग्यBeedबीडhospitalहॉस्पिटल