शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
2
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
3
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
4
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
5
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
6
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
7
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
8
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
9
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
10
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
11
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
12
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
13
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
14
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
15
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
16
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
17
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
18
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
19
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
20
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."

प्रॉपर्टीसाठी पोटची मुलेच टपलीत जीवावर; बीडमध्ये ज्येष्ठ नागरिक वैतागले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2017 11:58 IST

मुले असतानाही आईवडलांना अनाथाश्रमात रहावे लागत असल्याची अनेक उदाहरणे समोर आहेत; परंतु घरातच वडिलांना ठेवून प्रॉपर्टीसाठी त्यांचा छळ केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी समोर आला आहे.

ठळक मुद्देपोलीस अधीक्षक कार्यालयात प्राप्त ज्येष्ठांच्या वाढत्या तक्रारीवरून ही बाब समोर आली आहे.मागील चार महिन्यांत ७७४१०९३००० या हेल्पलाईनवर २० तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.

बीड : मुले असतानाही आईवडलांना अनाथाश्रमात रहावे लागत असल्याची अनेक उदाहरणे समोर आहेत; परंतु घरातच वडिलांना ठेवून प्रॉपर्टीसाठी त्यांचा छळ केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी समोर आला आहे. पोलीस अधीक्षक कार्यालयात प्राप्त ज्येष्ठांच्या वाढत्या तक्रारीवरून ही बाब समोर आली आहे. यावरून समाजात संयुक्त कुटुंब दिसत असले तरी चार भिंतीतील वाद गंभीर बनत असल्याचे दिसून येत आहे.

‘तुझ्या नावावर असलेली जमीन माझ्या नावावर का करत नाहीस म्हातार्‍या’ असे म्हणत कैलास राऊत या मुलाने नारायण राऊत या ८० वर्षीय आपल्या जन्मदात्या बापावरच कोयत्याने हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले. ही घटना ९ डिसेंबर रोजी बीड तालुक्यातील पाली येथे घडली होती. हा दुर्दैवी बाप जिल्हा रुग्णालयातील अतीदक्षता विभागात मृत्यूशी झुंज देत आहे. हीच घटना डोळ्यासमोर ठेवून पोलीस अधीक्षक कार्यालयात ज्येष्ठांसाठी सुरू करण्यात आलेल्या हेल्प लाईनकडे आलेल्या तक्रारीचा ‘लोकमत’ने आढावा घेतला. मागील चार महिन्यांत ७७४१०९३००० या हेल्पलाईनवर २० तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यातील ९० टक्के तक्रारी मुलांकडून प्रॉपर्टीसाठी होत असलेल्या त्रासाच्या आहेत. अधीक्षक कार्यालयाकडून निरसनही करण्यात आल्याचे फौजदार दीपाली गित्ते म्हणाल्या.

अशा आहेत तक्रारी...शहरी भागातील ज्येष्ठ नागरिकांनी प्लॉट, फ्लॅट, उद्योग व्यवसाय यासंदर्भात मुलांकडून छळ होत असल्याच्या तक्रारी आहेत, तर ग्रामीण भागातील ज्येष्ठांकडून शेती, दागिने व घर या संदर्भात  तक्रारी सर्वाधिक आहेत.

असे केले जाते निरसनअधीक्षक कार्यालयातील हेल्पलाईन क्रमांकावर तक्रार होते. संबंधित पोलीस स्टेशनला ही तक्रार वर्ग केली जाते. तसेच तिचा पाठपुरावा होतो. आठवडाभरातच ती निकाली काढली जाते. समस्या गंभीर असेल तर गुन्हा दाखल होतो अन्यथा समेट घडवून आणत वाद मिटविला जातो. दरम्यान, आतापर्यंत किती लोकांपर्यंत गुन्हे दाखल झाले, याची माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.

पोलिसांकडून ज्येष्ठांना आधारचार महिन्यांपूर्वी बीड शहर पोलीस ठाण्यात कार्यक्रम घेऊन ज्येष्ठ नागरिकांसाठी कायदेविषयक माहिती पुस्तिका व हेल्प लाईन क्रमांकाचे लोकार्पण करण्यात आले. पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी ज्येष्ठांना ज्येष्ठांना  माहिती देण्याबरोबरच तक्रारी निरसन करण्याचा विश्वास दिला होता. त्या आधारावरच ज्येष्ठ तक्रार देण्यासाठी पुढे येत आहेत.

गल्लीतल्या मुलांकडूनही चेष्टाज्येष्ट नागरिकांना घरात बसून अनेकवेळा करमत नाही. त्यामुळे थोडासा व्यायाम आणि विरंगुळा व्हावा, यासाठी ते घराबाहेर पडतात. परंतु बाहेर पडल्यानंतर गल्लीतल्या लहान मुलांच्या चेष्टेला त्यांना सामोरे जावे लागतात. तरूण, युवक व लहान मुले त्यांची चेष्टा करीत असल्याच्या तक्रारींचा आकडाही ५ टक्केच्यावर आहे. लहान मुले, तरूणांकडून होणारी चेष्टा ज्येष्टांसाठी त्रासहदायक ठरू  पहात आहे.

तक्रारी सोडवण्यावर भर तक्रार प्राप्त होताच संबंधित ठाण्याकडे ती वर्ग करून आठवडाभरात तिचे निरसन केले जाते. ज्येष्ठांकडून तक्रारी वाढत आहेत. त्या सोडविल्याही जात आहेत. कुणाला त्रास होत असेल तर तात्काळ ७७४१०९३००० या क्रमांकावर संपर्क साधावा.- जी. श्रीधर, पोलीस अधीक्षक