शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

बिहारी कामगारांचे मुले शिकणार बीडच्या जिल्हा परिषद शाळेत; जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पुढाकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2025 15:22 IST

बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या कृतीमुळे दुर्लक्षित घटकांच्या मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यात आले.

बीड : बिहार येथून रोजगाराच्या शोधात येथील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात बांधकामावर मजूर म्हणून आलेल्या कुटुंबातील तीन बालकांना पोलिस कॉलनीतील जिल्हा परिषद शाळेत मंगळवारी प्रवेश देण्यात आला. जिल्हाधिकाऱ्यांच्या कृतीमुळे दुर्लक्षित घटकांच्या मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यात आले. शेख नाजली बेगम मु. नौशाद (इयत्ता तिसरी), शेख शहाजान (इयत्ता दुसरी) व शेख खुशनूरी (इयत्ता पहिली) अशी प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांची नावे आहेत.

जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या हस्ते या नवप्रवेशितांना शालेय साहित्याचे वितरण करण्यात आले. मुलांशी आपुलकीने संवाद साधत त्यांना नियमित शाळेत उपस्थित राहण्याचे आणि अभ्यासात लक्ष घालण्याचे मार्गदर्शन केले. पालकांनाही मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांना नियमित शाळेत पाठविण्याबाबत स्पष्ट सूचना दिल्या.

जिल्हाधिकाऱ्यांनी पाहिले अन् त्यांच्या शिक्षणाचा प्रारंभ झालाजिल्हाधिकारी कार्यालयाच्या नूतन इमारतीचे बांधकाम सुरू आहे. या कामावर बिहार येथील कामगार आहेत. हे कामगार परिसरातच पत्र्याच्या शेडमध्ये राहतात. एके दिवशी त्यांची मुले कार्यालय परिसरात खेळताना दिसून आल्याने जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी वाहन थांबवून या मुलांच्या पालकांशी चौकशी केली. ही मुले शाळेत नाहीत का? असा प्रश्न विचारून माहिती घेतली. त्यानंतर शिक्षणाधिकारी भगवान फुलारी यांना कळविले. त्यानुसार गटशिक्षणाधिकारी खान समंदर हमीद यांना सूचित केले. त्यानंतर खान यांनी संबंधित मजूर कुटुंबाशी संवाद साधून त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची आवश्यकता लक्षात घेतली. त्यानंतर पोलिस कॉलनीतील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र खेडकर यांच्याशी चर्चा करून प्रवेश प्रक्रिया पूर्ण केली. जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने या मुलांच्या शैक्षणिक प्रवासाचा प्रारंभ घडवून आणला.

टॅग्स :zp schoolजिल्हा परिषद शाळाcollectorजिल्हाधिकारीEducation Sectorशिक्षण क्षेत्रBeedबीड