शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! २ कोटी लोकांचे आधार क्रमांक कायमचे बंद झाले; UIDAI ने सुरु केली मोहिम...
2
Pune Crime: "तिच्या बेडरुममध्ये झोपवलं आणि..."; कोल्हापुरातील व्यक्तीसोबत पुण्यातील महिलेने काय काय केलं?
3
सात जन्माच्या साथीदारानेच केली क्रूरता! पतीमुळे ४ वर्षांच्या चिमुकल्याची आई ९ महिने तडफडत राहिली.. 
4
निवडणूक अधिकाऱ्यांना धोका, आयोगाने बंगाल पोलिसांना पत्र लिहिले; त्या घटनेची आठवून करून दिली
5
हर्बालाइफचा नवा 'लिफ्ट ऑफ' – शून्य साखर असलेलं, ऊर्जा देणारं इफर्व्हेसंट ड्रिंक, तुमचा दिवस बनवा अधिक जोमदार 
6
दत्त जयंती २०२५: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण कसे कराल? पाहा, नियम-योग्य पद्धत
7
सोनिया जी, राहुल जी आन् मी..., कर्नाटक सत्तासंघर्षावर खर्गेंचे मोठे सेंकत! पुढचे 48 तास महत्वाचे; "200% 'तेच' CM होणार"
8
कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय; रेअर अर्थ मॅग्नेट उत्पादनाला भारतात मोठी गती मिळणार
9
मायक्रोसॉफ्टचा बाजार उठणार की काय? गुगल कॉम्प्युटर, लॅपटॉपसाठी आणतेय ऑपरेटिंग सिस्टीम...
10
टीम इंडियाचा दबदबा संपत चाललाय, काही जण तर..; लाजिरवाण्या पराभवानंतर हर्षा भोगलेंनी सुनावलं
11
पंडित देशमुख खुनाचा मुद्दा २० वर्षांनंतर प्रचारात, मोहोळच्या देशमुखांसोबत काय घडलं होतं?
12
'थोडी वाट पाहा, फोन करतो', मुख्यमंत्री बदलाच्या चर्चेदरम्यान राहुल गांधींचा डीके शिवकुमार यांना मेसेज
13
एकनाथ शिंदे सत्ता मिळवून दिघे साहेबांचे स्वप्न साकारणार की गणेश नाईक पुन्हा दूर ठेवणार?
14
IND vs SA : गौतम गंभीरचा राजीनामा द्यायला नकार! म्हणाला, "मी जिंकवलेल्या मालिका आठवा..!!"
15
PF खातेधारकांसाठी मोठी बातमी! पेन्शन, पीएफ आणि ईपीएसच्या नियमांमध्ये मोठे बदल
16
सूरज चव्हाणचं प्री-वेडिंग फोटोशूट; होणाऱ्या पत्नीसोबत वेस्टर्न लूकमध्ये दिल्या रोमँटिक पोझ
17
सुनेवर अत्याचार, पतीचं बाहेर अफेअर; दीप्तीच्या भावाने 'कमला पसंद'च्या मालकाच्या कुटुंबावर केले आरोप!
18
बाजारात 'सुपर फास्ट' कमबॅक! बजाज-रिलायन्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी; फक्त २ स्टॉक्स घसरले
19
चीनची दादागिरी संपणार! EV आणि संरक्षण क्षेत्रासाठी आवश्यक 'रेअर अर्थ' खनिजांसाठी सरकारचा मोठा प्लॅन
20
घरासाठी कर्ज घेण्यास लोकांचा सरकारी बँकांवर जास्त भरोसा; ४० टक्के कर्ज ७५ लाखांपेक्षा अधिक
Daily Top 2Weekly Top 5

बालहक्क आयोग दारात, भीतीपोटी कुटुंब शेतात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2022 10:18 IST

Beed News: गर्भपातादरम्यान मृत्युमुखी पडलेल्या शीतल गाडे यांच्या मुलींची भेट घेण्यासाठी राज्य बालहक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षा सुशीबेन शहा व सदस्य २७ ऑगस्ट रोजी गावात पोहोचल्या; पण भीतीपोटी मुलींना घेऊन आजी शेतात जाऊन बसली.

बीड -  तालुक्यातील बक्करवाडीत गर्भपातादरम्यान मृत्युमुखी पडलेल्या शीतल गाडे यांच्या मुलींची भेट घेण्यासाठी राज्य बालहक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षा सुशीबेन शहा व सदस्य २७ ऑगस्ट रोजी गावात पोहोचल्या; पण भीतीपोटी मुलींना घेऊन आजी शेतात जाऊन बसली. त्यामुळे संवाद न करताच आयोगाला परतावे लागले. दरम्यान, पाली येथे एचआयव्ही निगेटिव्ह चिमुकल्यास पूर्व प्राथमिक खासगी शाळेने शिक्षणास मज्जाव केल्याचा प्रकार घडला होता. या मुलाची आयोगाने भेट घेतली. भीक मागताना आढळलेल्या सहा आदिवासी मुलांचा शासकीय बालगृहात छळ झाला होता, या मुलांना पुन्हा बालगृहात आणून शिक्षण हक्क मिळवून देण्यात येणार आहे. राज्य बालहक्क आयोगाच्या अध्यक्षा सुशीबेन शहा, सदस्य चेतन पुरंदरे, ॲड. प्रज्ञा खोसरे यांनी शनिवारी  बक्करवाडी, पाली येथे भेट दिली. त्यानंतर शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधताना शहा म्हणाल्या, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना ज्या काही घटना बीडमध्ये समोर येत आहेत, त्या लाजिरवाण्या आहेत. आई-वडील एचआयव्ही बाधित व मुलगा निगेटिव्ह असतानाही त्यास  शिक्षणापासून वंचित ठेवले जात असेल तर मानसिकता बदलण्याची गरज आहे. पालीतील मुलाला जवळ घेऊन संवाद साधला, त्याने मला शिकायचंय, अशी भावना व्यक्त केली, असे त्यांनी यावेळी नमूद केले.समाजाने या मुलांना वेगळी वागणूक देण्याऐवजी सामंजस्याने तोडगा काढावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. पोलीस अधीक्षक, शिक्षणाधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याशी चर्चा केल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Beedबीड