शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

बालविवाह, बापाकडून छळाने घर सोडले; जेवणाचे आमिष दाखवून दोन नराधमांचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2021 17:23 IST

अंबाजोगाई तालुक्यातील कुंबेफळ येथील अल्पवयीन विवाहिता सासरी व माहेरी होणारा छळ व लैंगिक शोषण याला कंटाळून मोरेवारी परिसरात असलेल्या बसस्थानक परिसरात भिक्षा मागुन उपजीविका करत होती.

अंबाजोगाई-:घर सोडून मोरेवाडी  बसस्थानक परिसरात वास्तव्यास असलेल्या अल्पवयीन विवाहितेस जेवण देण्याचे आमिष दाखवून दोघांनी बलात्कार केला.तर मुलीचा अल्पवयीन विवाह केल्याप्रकरणी तिच्या कुटुंबीयांविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे.

अंबाजोगाई तालुक्यातील कुंबेफळ येथील अल्पवयीन विवाहिता सासरी व माहेरी होणारा छळ व लैंगिक शोषण याला कंटाळून मोरेवारी परिसरात असलेल्या बसस्थानक परिसरात भिक्षा मागुन उपजीविका करत होती. १५ दिवसांपूर्वी अंबाजोगाई शहरातील ज्ञानदीप अकॅडमीतील हरी दराडे व ऋषीकेश दत्तात्रय सांगळे यांनी पीडित मुलीस तुला जेवायला देतोत म्हणून आडस रोडवर निर्जन स्थळी नेऊन तिच्यावर बलात्कार केला.सदरील अल्पवयीन मुलीची आई ती आठ वर्षाची असतानाच मृत्यू पावली. त्यानंतर पीडितेचे शिक्षण सोडून तिच्या वडिलांनी तिचे वयाच्या १३ व्या वर्षीच बालविवाह केला. विवाहानंतर पतीही तिचा मानसिक व शारीरिक छळ करू लागला. म्हणून विवाहिता माहेरी कुंबेफळ येथे राहण्यासाठी गेली तर माहेरी ही वडिलांकडून पीडितेचा लैंगिक छळ होऊ लागला.

या सर्व प्रकाराला वैतागून पीडिता अंबाजोगाई शहरालगत असलेल्या मोरेवाडी परिसरातील बसस्थानक परिसरात भिक्षा मागून उदरनिर्वाह करत होती. याचा गैरफायदा घेत तिच्यावर बलात्कार करण्यात आला. अल्पवयीन विवाहितेवर बलात्कार केल्या प्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून  ऋषिकेश दत्तात्रय सांगळे,हरी दराडे यांच्या विरुद्ध तर बालविवाह केल्या प्रकरणी कुटुंबातील सहाजण व विवाह लावणाऱ्या पुरोहित यांच्या विरुद्ध ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक व्ही.पी.पेठकर करीत आहेत.

सामाजिक संस्थांचा पुढाकारअल्पवयीन विवाहित पीडितेवर बलात्कार झाल्याची माहिती मानवलोकच्या कार्यकर्त्यांना समजली. त्यांनी अप्पर पोलीस अधीक्षक यांना या घटनेची माहिती दिली. सर्व प्रकार समजून घेतल्यानंतर पीडितेस ग्रामीण पोलीस ठाण्यात पाठवुन गुन्हा नोंदविण्यात आला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBeedबीड