शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

'मुलाचा खून झाला अन् बाप हॉटेलात नाष्टा करतोय'; चाणाक्ष पोलिसांनी यावरून केला खुनाचा उलगडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2021 17:22 IST

Father killed alcoholic son: तरुण व्यसनाधीन होता मात्र त्याचे गावात कोणाशी भांडण नसल्याने तपासाचे आव्हान होते

ठळक मुद्देमुलगा दारू पिऊन आईवडील आणि नातेवाईकांना त्रास देत असे रागाच्या भरात वडिलांनी धारदार शस्त्राने मुलावर वार केला

- दीपक नाईकवाडे

केज ( बीड ) : तालुक्यातील दैठणा येथे एका ३८ वर्षीय तरुणाचा अज्ञात व्यक्तीने खून केल्याची घटना घडली होती. या प्रकरणी चाणाक्ष पोलिसांनी अत्यंत जलद तपास करत अवघ्या बारा तासात आरोपीला अटक केली आहे. धक्कादायक म्हणजे या तरुणाचा खून साळसूदपणाचा आव आणणाऱ्या त्याच्या बापानेच केल्याचे उघडकीस ( Father killed alcoholic son ) आले आहे. पोलीस चौकशीत पोटच्या पोराचा खून केल्याची कबुली आरोपीने दिली आहे. 

याबाबतची अधिक माहिती अशी की, बुधवारी ( दि. २०) तालुक्यातील दैठणा येथे विशाल चंद्रकांत मुळे या ३८ वर्षीय विवाहित तरुणाचा अज्ञात व्यतीने खून करून मृतदेह स्मशान भूमीकडे जाणाऱ्या रस्त्यावर खड्ड्यात टाकल्याची खळबळजनक घटना घडली होती. माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे, पोलीस उपनिरीक्षक दादासाहेब सिद्धे यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. विशालला दारूचे व्यसन होते मात्र त्याचे गावात कोणाशी भांडण नव्हते, यामुळे खून कोणी आणि का केला याच्या तपासाचे आव्हान पोलिसांच्या पुढे होते. 

तपासात श्वान पथकाची देखील मदत घेण्यात आली मात्र हाती काही लागले नाही. मात्र, अंत्यसंस्कार होताच पोलिसांनी संशयावरून मृताचे वडील चंद्रकांत उद्धव मुळेला ( ६० ) ताब्यात घेतले. व्यसनाधीन मुलगा दारू पिऊन आईवडील आणि नातेवाईकांसोबत सतत भांडण करत असे, याला वैतागून धारदार शस्त्र डोक्यात मारले आणि त्याचाच घाव वर्मी बसला. यातच मुलाचा मृत्यू झाल्याची कबुली चंद्रकांत मुळेने दिली. 

मुलाचा खून झाला अन बाप हॉटेलात नाष्टा करतोय या खुनाचा तपास करताना पोलीस अधिकाऱ्यांना काहीच पुरावा सापडत नव्हता. कुटुंबातील सदस्य ही काहीच बोलत नव्हते. वडिलांच्या चेहऱ्यावर सुद्धा मुलाच्या मृत्यूचे दुःख दिसत नव्हते. दरम्यान, पंचनामा करत असताना चद्रकांत याने  हॉटेलमध्ये जाऊन नाष्टा केला नेमकी हीच गोष्ट पोलीस अधिकाऱ्यांना खटकली. यावरून अंत्यविधी आटोपताच पोलिसांनी आरोपीस ताब्यात घेतले. या खुनाच्या तपासात अतिरिक्त पोलीस अधिक्षक सविता नेरकर व सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे, पोलीस उपनिरीक्षक दादासाहेब सिद्धे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक कादरी, पोलीस जमादार शिवाजी शिनगारे, अशोक नामदास, अनिल मंदे, जसवंत शेप, शेख, शेषेराव यादव, हुंबे आणि दिलीप गित्ते यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. 

टॅग्स :BeedबीडCrime Newsगुन्हेगारीArrestअटकPoliceपोलिस