शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

"सुरेश धस मागे लागले की डोकं खाऊन टाकतात"; आधुनिक भगीरथ म्हणत CM फडणवीसांकडून जोरदार कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2025 16:45 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आष्टीमध्ये बोलताना आमदार सुरेश धस यांचे कौतुक केले.

CM  Devendra Fadnavis:बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे प्रकरण भाजपचे आमदार सुरेश धस यांनी लावून धरलं आहे. संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना शिक्षा व्हावी यासाठी सुरेश धस यांनी अनेक मोर्चे देखील काढले होते. या प्रकरणात सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांनाही लक्ष्य केलं आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून सुरेश धस यांना आवर घालण्याची मागणी करण्यात येत होती. अशातच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका कार्यक्रमात बोलताना सुरेश धस यांचे जोरदार कौतुक केलं आहे. आमदार सुरेश धस हे आधुनिक भगीरथ असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलं.

बीडच्या आष्टी मतदारसंघातील खुंटेफळ साठवण तलाव प्रकल्पाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले आहे. यावेळी आमदार सुरेश धस, खासदार बजरंग सोनावणे आणि मंत्री पंकजा मुंडे उपस्थित होत्या. या कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्री फडणवीस यांनी सुरेश धस यांच्या कामाचे कौतुक केले. या कामामुळे आमदार सुरेश धस यांचा उल्लेख या तालुक्यामध्ये आधुनिक भगीरथ म्हणून होणार आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. तसेच सुरेश धस मागे लागले की डोकं खाऊन टाकतात असंही मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलं.

"या प्रकल्पाला २०२२ मध्ये आमच्या सरकारने सुप्रमा दिली. या प्रकल्पाला ११ हजार कोटी रुपयांची सुप्रमा दिली आहे. कारण सुरेश धस एकदा मागे लागले तर ते डोके खाऊन टाकतात, हा शब्द चुकीचा असला तरी त्यांच्यामुळे आता हे काम अत्यंत वेगाने सुरू आहे. धाराशिव जिल्हा आणि आष्टी तालुक्यात देखील मोठ्या प्रमाणात पाणी आपण आणणार आहोत. या भागातला दुष्काळ आता भूतकाळ होणार आहे, संपूर्ण परिसर हा बागायती झालेला असेल," असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.

"२०१४-१५ मध्ये दुष्काळाच्या काळात आपल्या सरकारने जलयुक्त शिवार योजना सुरू केली. या योजनेमुळे अनेक गावे पाणीदार झाली. उच्च न्यायालयाच्या समितीने देखील इतक्या वर्षात पहिल्यांदा भूजल पातळी वाढली असल्याचे सांगितले. मात्र, मराठवाड्याला कायम दुष्काळ मुक्त करायचे असेल तर जलसंधारणाच्या कामाबरोबरच जोपर्यंत पश्चिम वाहिन्यांचे पाणी समुद्रात जाणारे पाणी गोदावरीच्या खोऱ्यात आणत नाही, तोपर्यंत मराठवाडा दुष्काळमुक्त होऊ शकत नाही," मुख्यमंत्री असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

मुख्यमंत्र्यांची कणखर भूमिका सर्वांना आवडली - सुरेश धस

"मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आपण जी संतोष देशमुख प्रकरणांत कणखर भूमिका घेतली ती सर्व जनतेला आवडली आहे. मुख्यमंत्री साहेब तुम्ही जे म्हणाले की संतोष देशमुख प्रकरणातील आरोपीला सोडणार नाही यावर सर्व जनतेचा विश्वास आहे," असं सुरेश धस यांनी म्हटलं.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSuresh Dhasसुरेश धसPankaja Mundeपंकजा मुंडेBeedबीड