धारुर तहसील कार्यालयातील निराधार योजना विभागाचे वतीने नायब तहसीलदार रामेश्वर स्वामी, प्रकाश गोपड व संगायो वरिष्ठ लिपिक देवकते यांच्या सहकार्याने पाठपुरावा करीत सामाजिक कार्यकर्ते अतीक मोमीन, बाबू भाई व पत्रकार बांधव यांनी अर्थसहाय्य योजनेचा लाभ मिळवून दिला आहे. गेल्या दोन ते अडीच वर्षापासून धारुर शहरातील जरगर गल्लीमधील एका महिलेचे राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेची प्रकरण दाखल होते. परंतु ती फाईल सापडत नसल्याने अडचणी निर्माण झाल्या होत्या. प्रशासनाने सहकार्य करीत त्या महिलेची राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेतून फाईल मंजूर करून वीस हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला आहे. शेख जरिना जब्बार यांना कुटुंब अर्थसहाय्य योजनेच्या लाभाचा धनादेश नायब तहसीलदार प्रकाश गोपड यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते अतीक मोमीन, नाथा ढगे, अतुल शिनगारे, रवी गायसमुद्रे, शेख इरफान हे उपस्थित होते.
प्रलंबित राष्ट्रीय कुटूंब अर्थसहाय्यचा लाभार्थीला धनादेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:22 IST