शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
4
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
5
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
6
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
7
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
8
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
9
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
10
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
11
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
12
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
13
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
14
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
15
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
16
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
17
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
18
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
19
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक

बीडमध्ये पाठलाग करून दुचाकीचोर पकडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2018 01:06 IST

बीड :चौसाळा येथील बसस्थानकातून दुचाकी चोरून पळ काढणाऱ्यास दरोडा प्रतिबंधक पथकाने पकडले. ही कारवाई मंगळवारी सकाळी ९ वाजता मांजरसुंंबा रोडवर केली.अशोक दिलीप रगडे (३३ रा.स्नेहनगर, बीड) असे पकडलेल्या दुचाकीचोराचे नाव आहे. दरोडा प्रतिबंधक पथकाचे प्रमुख सपोनि गजानन जाधव, गणेश दुधाळ, उबाळे, राठोड, नागरगोजे, बांगर, जोगदंड, साबळे हे नेकनूर परिसरात गुन्हेगारांचा ...

बीड :चौसाळा येथील बसस्थानकातून दुचाकी चोरून पळ काढणाऱ्यास दरोडा प्रतिबंधक पथकाने पकडले. ही कारवाई मंगळवारी सकाळी ९ वाजता मांजरसुंंबा रोडवर केली.

अशोक दिलीप रगडे (३३ रा.स्नेहनगर, बीड) असे पकडलेल्या दुचाकीचोराचे नाव आहे. दरोडा प्रतिबंधक पथकाचे प्रमुख सपोनि गजानन जाधव, गणेश दुधाळ, उबाळे, राठोड, नागरगोजे, बांगर, जोगदंड, साबळे हे नेकनूर परिसरात गुन्हेगारांचा शोध घेत होते. याचवेळी त्यांना चौसाळा बसस्थानकातून एक संशयित व्यक्ती दुचाकी घेऊन जाताना दिसला. त्यांनी हटकले असता त्याने पळ काढला. त्यानंतर पथकाने त्याचा पाठलाग करून त्याला अटक केली. त्याने आपला गुन्हा कबूल केला असून नेकनूर पोलिसांच्या स्वाधीन त्याला केले असल्याचे जाधव म्हणाले.

कत्तलीसाठी जात होत्या गायीकत्तलसाठी जाणाºया सात गायींची सुटका करण्यात आली. तसेच एक टेम्पो (एमएच ४३ बी ९१६३) जप्त करून शेख शकील शेख मोहंम्मद व शेख शाहीद शेख पाशा (रा.नेकनूर) या चालक व क्लिनरला ताब्यात घेतले. त्यांना नेकनूर पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. सध्या गायी या नेकनूरजवळील एका गोशाळेत असल्याचे पोनि गोंदकर यांनी सांगितले. ८ जुलै रोजी ही कारवाई करण्यात आली.

टॅग्स :BeedबीडThiefचोरMarathwadaमराठवाडा