शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

‘शुभकल्याण’च्या सर्वच गुन्ह्यांत दोषारोपपत्र दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2019 19:41 IST

शेकडो ठेवीदारांना गंडा घालणाऱ्या गुन्ह्याचा तपास पूर्ण

बीड : जिल्ह्यातील शेकडो ठेवीदारांना करोडोंचा गंडा घालणाऱ्या कळंबच्या शुभ कल्याण मल्टीस्टेट विरोधात जिल्ह्यात विविध पोलीस ठाण्यात दहा गुन्हे दाखल झाले होते. आर्थिक गुन्हे शाखेने या गुन्ह्यांचा तपास करून दहाही गुन्ह्यांत दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले आहे.

दिलीप आपेट अध्यक्ष असलेल्या शुभकल्याण मल्टीस्टेटचे जिल्ह्यात सर्वत्र जाळे निर्माण झाले होते. ठेविदारांना जादा व्याजदराचे आमिष दाखवून त्यांनी करोडोंचा गंडा घातला. वारंवार मागणी करूनही ठेविदारांना पैसे परत मिळत नसल्याने ते आक्रमक झाले. सुरूवातीला तक्रारी केल्या. नंतर जिल्ह्यातील बीड, गेवराई, आष्टी, नेकनूर, माजलगाव, केज या तालुक्यात दहा गुन्हे नोंद झाले होते. आगोदर पोलीस ठाणे स्तरावर या प्रकरणाचा तपास करण्यात आल्यानंतर पुन्हा हा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला.

सुरूवातीला तपास कासवगतीने सुरू होता, मात्र, नंतर  वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत शिंदे यांनी पदभार स्विकारताच सर्व गुन्ह्यांचा ‘अ’ पासून तपास सुरू केला. पंचनामा, जबाब, पुरावे हस्तगत करून बँक शाखांना सील केले. याबरोबरच दिलीप आपेटलाही बेड्या ठोकल्या. दरम्यान, सर्व पुरावे जमा झाल्यानंतर शिंदे यांनी दहाही गुन्ह्यांमधील दोषारोप पत्र न्यायालयात दाखल केले आहे. 

बीडमध्ये सात गुन्हेमाजलगाव येथील परिवर्तन मल्टीस्टेट व सामाजिक परिवर्तन पतसंस्थेनेही जादा व्याजाचे आमिष दाखवून ठेवीदारांची फसवणूक केली आहे. या प्रकरणात जिल्ह्यात सात पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले होते. विजय अलझेंडे हा या पतसंस्थेचा अध्यक्ष आहे. दरम्यान, बीडच्या शिवाजीनगर ठाणे व माजलगाव शहर ठाण्यात दाखल गुन्ह्याचा तपास पूर्ण करुन त्याचेही दोषारोपपत्र दाखल केले आहे. पोनि. प्रशांत शिंदे व सपोनि. व्ही.एस.पाटील यांनी या गुन्ह्यांचा तपास पूर्ण केला आहे.

शुभकल्याणच्या दहाही गुन्ह्यांचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले आहे. तसेच माजलगावच्या परिवर्तनच्याही दोन गुन्ह्यांचा तपास पूर्ण करून दोषारोपपत्र दाखल केले आहे. इतर गुन्ह्यांचाही तपास अंतिम टप्यात असून लवकरच दोषारोपपत्र दाखल केले जाईल.-प्रशांत शिंदे, पोलीस निरीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा, बीड

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBeedबीडPoliceपोलिसfraudधोकेबाजी