शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षण विभागाची विस्कटलेली घडी व्यवस्थित करण्याचे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2020 23:21 IST

सप्टेंबरमध्ये बीड येथे नियुक्ती झालेले उपशिक्षणाधिकारी सुदाम रुपला राठोड हे ३१ डिसेंबर रोजी प्रभारी शिक्षणाधिकारी पदावरुन सेवानिवृत्त झाले. त्यामुळे प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी पद पुन्हा रिक्त झाले आहे.

ठळक मुद्देकशी राखणार गुणवत्ता ? : शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी निवृत्त, पदभार कोणाकडे ?

बीड : सप्टेंबरमध्ये बीड येथे नियुक्ती झालेले उपशिक्षणाधिकारी सुदाम रुपला राठोड हे ३१ डिसेंबर रोजी प्रभारी शिक्षणाधिकारी पदावरुन सेवानिवृत्त झाले. त्यामुळे प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी पद पुन्हा रिक्त झाले आहे. तर प्राथमिक आणि माध्यमिक उपशिक्षणाधिकारी या पदासह गटशिक्षणाधिकाऱ्यांची दहा पदे रिक्तच आहेत. नव्या वर्षात शिक्षण विभागाच्या प्रशासनातील विस्कटलेली घडी व्यस्थित करण्याचे आव्हान जिल्हा परिषद प्रशासनापुढे आहे.केंद्र व राज्य सरकारच्या शैक्षणिक उपक्रम, योजनांच्या प्रभावी अंमलबजावणी तसेच प्रशासकीय कामाकाजासाठी आणि शैक्षणिक गुणवत्तेसाठी परिपूर्ण अस्थापना आवश्यक असते. परंतू गेल्या काही वर्षांपासून महत्वाच्या असलेल्या शिक्षण विभागाकडे शासन, प्रशासन आणि लोकप्रतिनिधींची अनास्था राहिली. त्यामुळे या विभागात अनेकदा अवमेळ दिसून आला.शिक्षणाधिकारी भावना राजनोर यांच्या बदलीनंतर माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी भगवान सोनवणे यांच्याकडे प्रभारी पदभार देण्यात आला. नंतर राजेश गायकवाड यांच्याकडे प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी पदाचा पदभार आला. त्यांच्या रजेच्या काळात पुन्हा सोनवणे यांच्याकडे पदभार आला. गायकवाड रुजू झाले तर माध्यमिक विभागाचे सोनवणे यांची लातूरला बदली झाली. त्यामुळे माध्यमिक विभागाचा पदभार नजमा सुलताना यांच्याकडे आला. दरम्यानच्या काळात सप्टेंबरमध्ये शासनाने बीड येथे प्राथमिक विभागात उपशिक्षणाधिकारी पदी सुदाम राठोड यांची नियुक्ती केली. त्यानंतर महिनाभरातच न्यायालयीन प्रकरणात दोषी आढळल्याने शिक्षणाधिकारी (प्रा.) राजेश गायकवाड यांना शासन सेवेतून बडतर्फ करण्यात आले. त्यामुळे पुन्हा हे पद रिक्त होते. तात्पुरती व्यवस्था म्हणून उपशिक्षणाधिकारी सुदाम राठोड यांच्याकडे शिक्षणाधिका-याचा प्रभारी पदभार सोपविण्यात आला. मात्र चार महिन्यातच राठोड हे सेवानिवृत्त झाल्याने उपशिक्षणाधिकारी व शिक्षणाधिकारीचे पद रिक्त झाले आहे.आज निर्णय : पुन्हा प्रभारी राजतात्पुरती व्यवस्था म्हणून प्रभारी शिक्षणाधिकारीचा पदभार कोणाकडे जाणार याकडे लक्ष लागले आहे.माध्यमिक विभागाच्या प्रभारी शिक्षणाधिकारी नजमा सुलताना, प्रभारी उपशिक्षणाधिकारी भगवान सोनवणे, वडवणीच्या गटशिक्षणाधिकारी मिनाज पटेल आणि शालेय पोषण आहार अधीक्षक अजय बहिर यांचे प्रस्ताव वरिष्ठांपुढे सदर झाले आहेत. त्यावर गुरुवारपर्यंत निर्णय होईल, असे सूत्रांनी सांगितले.सध्याची रिक्त १६ पदेशिक्षणाधिकारी ३ - माध्यमिक व प्राथमिक, निरंतरउपशिक्षणाधिकारी ३ -माध्यमिक १ व प्राथमिक २गटशिक्षणाधिकारी १०(या रिक्त पदांवर प्रभारीच काम पाहत आहेत, तर वडवणी येथे एकमेव पदाच्या गटशिक्षणाधिकारी आहेत.)

टॅग्स :Beedबीडzpजिल्हा परिषदEducation Sectorशिक्षण क्षेत्र