शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

माजलगावात मराठा आरक्षणासाठी चक्का जाम आंदोलन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2018 17:46 IST

परळी येथे दोन दिवसापासून सूरु असलेल्या मराठा क्रांती मोर्चाला पाठींबा देण्यासाठी आज सकाळी परभणी फाटा येथे तीन तास चक्काजाम आंदोलन करण्यात आले.

माजलगाव ( बीड) – परळी येथे दोन दिवसापासून सूरु असलेल्या मराठा क्रांती मोर्चाला पाठींबा देण्यासाठी आज सकाळी परभणी फाटा येथे तीन तास चक्काजाम आंदोलन करण्यात आले. तीन तास सुरु असलेल्या आंदोलनकर्त्यांना पांगविण्यासाठी पोलिसांनी सोम्य लाठीचार्ज केला असता संतप्त आंदोलनकर्त्यांनी पोलिसांवर दगडफेक केली. आंदोलनादरम्यान एक खाजगी गाडी फोडण्यात आली तर, तहसील कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी मुंडण करून सरकारचा निषेध नोंदविला.

सरकारी नौकरीत मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय नौकरभरती करण्यात येऊ नये या मागणीसाठी दोन दिवसापासून परळी येथे मराठा क्रांती मोर्चाचे ठिय्या आंदोलन चालू आहे. या आंदोलना पाठींबा देण्यासाठी आज सकाळी साडेदहा वाजता राष्ट्रीय महामार्ग २२२ आणि ५४८ (सी) या दोन्ही महामार्गावर चक्काजाम आंदोलन करण्यात आले. सुरवातीला सुरळीत सुरु असलेले आंदोलन नंतर चिघळत गेले. आंदोलनादरम्यान वाहने घेऊन जाणाऱ्या गाड्यांना आंदोलनकर्त्यांनी लक्ष करून त्यांची तोडफोड करायला सुरुवात केली. यात एक खाजगी गाडी, मोटारसायकल फोडण्यात आली. यामुळे पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना पांगविण्यासाठी पोलिसांनी सोम्य लाठीचार्ज करायला सुरुवात केली असता आंदोलक अधिकच संतप्त झाले. त्यांनी पोलिसांच्या दिशेने दगडफेक करायला सुरुवात केल्याने एकच गोंधळ उडाला होता. सभापती अशोक डक, जयदत्त नरवडे, नीलकंठ भोसले आदींनी यांनी मध्यस्थी करून परस्थिती नियंत्रणात आणली. 

आंदोलन चिघळण्याची चिन्हे असल्याने सहायक अधीक्षक भाग्यश्री नवटके तत्काळ घटनास्थळी आल्या. त्यांनी विनंती केल्याने आंदोलनकर्त्यांनी तहसील कार्यालयाकडे मोर्चा वळविला. तहसील कार्यालयाच्या गेट समोर ठिय्या आंदोलन सुरु केले. यावेळी आठ, दहा युवकांनी स्वतःचे मुंडण करून सरकारचा निषेध नोंदविला. शेवटी तहसीलदारांना निवेदन देऊन आंदोलन मागे घेण्यात आले. या आंदोलनात माजलगाव तालुक्यातील तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या आंदोलनास दलित, मुस्लीम, ओबीसी समाजाच्या नेत्यांनी सहभागी होत पाठींबा दिला.

टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाagitationआंदोलनTahasildarतहसीलदार