शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

‘चाकरवाडीची माऊली म्हणजे साक्षात पांडुरंग’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2019 00:24 IST

विसाव्या शतकातील महान संत विभूती वै. ज्ञानेश्वर माऊली चाकरवाडीकर यांच्या एकोणिसाव्या पुण्य तिथी उत्सवाची काल्याच्या कीर्तनाने थाटात सांगता झाली.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : विसाव्या शतकातील महान संत विभूती वै. ज्ञानेश्वर माऊली चाकरवाडीकर यांच्या एकोणिसाव्या पुण्य तिथी उत्सवाची काल्याच्या कीर्तनाने थाटात सांगता झाली.पुण्यतिथीनिमित्त विधिवत समाधीस अभिषेक करुन सकाळी १० ते १२ दरम्यान रामरावजी महाराज ढोक यांचे काल्याचे सुश्राव्य कीर्तन झाले. यावेळी आ. संगीता ठोंबरे, नंदकिशोर मुंदडा, संदिपान महाराज हासेगावकर, लक्ष्मण महाराज मेंगडे. एकनाथ महाराज लोमटे, महादेव महाराज, नारायण महाराज, प्रा.नाना महाराज कदम, प्रा.सुरेश महाराज जाधव, नवनाथ महाराज जरुड, शिवानंद महाराज गिरीसह हजारो भाविक उपस्थित होते.महाराष्ट्रतील थोर संत गुरुवर्य दादा माऊली यांच्या पुण्यतिथी निमित्त गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाची रविवारी काल्याच्या कीर्तनाने सांगता झाली. यावेळी रामायणाचार्य रामरावजी ढोक महाराज यांनी ‘ये दशे चरित्र केले नारायणे। रांगता गोधने राखीता हें ॥’ या काल्याच्या अभंगावर चिंतन मांडले. प्रस्तावना करतांना ज्ञानेश्वर माऊलीनी सामाजिक ऐक्य करत जाती धर्माच्या उतरंडी बाजूला सारून सर्व समाज एकत्रित केला. त्यांना अध्यात्मिक धडे दिले. प्रेमळ माऊली, दातृत्वाची मूर्तिमंत माय, भक्ताचा प्रेमाचा गाभा अशी अनेक रूपे आहेत. प्रत्यक्ष जगण्यातून आध्यात्मिक क्रांती केलेल्या संत मालिकेतील अग्रगण्य संत म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात माऊली दादाची ओळख चंद्र सूर्य असे पर्यन्त राहिला असे ढोक महाराज म्हणाले.संप्रदायात चाकरवाडी हे प्रती पंढरपूर आहे. दादा माऊली गरीब भाविक भक्त मंडळीचा विठोबा आहेत. म्हणून दिवसेंदिवस गर्दी वाढत आहे. अन्नदानासह ज्ञानदान देणारी माऊली सर्व भक्त मंडळीवर आईच्या मायेचे पांघरुण घालत होती. म्हणून तर आज हा जनसमुदाय येथे उपस्थित असल्याचे ढोक महाराज म्हणाले. यावेळी पखवाज पंडित राम महाराज काजळे, संगीत विशारद बिभीषण महाराज कोकाटे, अभिमन्यू महाराज काळे, अभिमान महाराज ढाकणे, विष्णू महाराज शेंडगे, माऊली महाराज जालना, संजय महाराज देवकर, रामकिसन देवकर व परिसरातील सर्व टाळकरी मंडळी यांची साथसंगत लाभली. काल्याच्या कीर्तनानंतर महापंगत झाली. यात ट्रॅक्टरने प्रसाद वाटप करण्यात आला. माऊली दादाच्या स्वयंसेवकांच्या कुशल व्यवस्थेने लाखो लोकांना महाप्रसाद जागेवर मिळाला. यावेळी उपस्थित मान्यवरांचे महादेव महाराज यांच्यातर्फे शिवानंद गिरी यांनी आभार मानले

टॅग्स :Religious Placesधार्मिक स्थळेReligious programmeधार्मिक कार्यक्रमSocialसामाजिक