किल्लेधारूर : राज्याचे माजी उपमुख्यमंत्री स्व. आर. आर. पाटील सुंदर गाव स्पर्धेत जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या धारूर तालुक्यातील आवरगाव येथे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी भेट देऊन गावातील सर्व कामांची पाहणी केली. ग्रामस्थांचे कौतुक करून हे गाव राज्यात आदर्श बनेल, असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी कुंभार यांनी ग्रामपंचायत कार्यालय, अंगणवाडी, जिल्हा परिषद शाळा, व्यायामशाळा, वाचनालय, क्रीडांगण, वृक्षलागवड, वृक्षसंवर्धन, पाणी व्यवस्थापन, कचरा व्यवस्थापन, गावातील सार्वजनिक ठिकाणे, मंदिर, रस्ते, गाव स्वच्छतेची पाहणी केली. गावात केलेल्या कामांबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. सरपंच अमोल जगताप यांच्यासह गावकऱ्यांचे त्यांनी कौतुक केले. यावेळी सुनील शिंदे, आगळे, माने, सरपंच अमोल जगताप, ग्रामसेवक बालासाहेब झांबडे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
आदर्श गावासाठी सातत्य ठेवा
आवरगाव पाहिल्यानंतर आनंद वाटला. खरच इथे खूप छान काम झाले आहे. बीड जिल्ह्यात सुद्धा हिवरेबाजार, राळेगणसिद्धीसारखे आवरगाव हे गाव आहे, हे पाहण्यासाठी बाहेरून लोक येतील, असे आपले गाव तयार झालेले आहे. गावकऱ्यांनी यात सातत्य ठेवून नावीन्यपूर्ण विविध उपक्रम राबवावेत, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी केले.
===Photopath===
040321\img-20210303-wa0177_14.jpg