परळी ( बीड) : येथील सरस्वती विद्यालयातील मतदान केंद्रावर मतदान केंद्राची प्रक्रिया सुरू असताना मतदान केंद्र प्रमुख जालिंदर जाधव यांना दुपारी अस्वस्थ वाटू लागले. त्यांना तत्काळ शहरातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
दरम्यान, माहिती मिळताच परळीचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, तहसीलदार व्यंकटेश मुंडे व नायब तहसीलदार बाबुराव रुपनर यांनी दवाखान्यात जाऊन जाधव यांची भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली. मतदान केंद्र प्रमुख जालिंदर जाधव यांना हृदयविकाराचा सौम्य धक्का आल्याचे सांगण्यात आले. त्यांना उपचार करून त्यांच्या बीड येथे घरी पाठविण्यात आले आहे.