शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

राफेल घोटाळा दडपडण्यासाठी सीबीआयचे संचालक सक्तीच्या रजेवर : खरगे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2018 00:14 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राफेल घोटाळा आपल्या अंगलट येतो की काय असे वाटल्याने तो दडपण्यासाठी सीबीआय सारख्या महत्त्वपूर्ण संस्थेत पंतप्रधानांनी ढवळाढवळ करून सीबीआयच्या संचालकांना रात्रीतून सक्तीच्या रजेवर पाठवले. आजपर्यंतच्या कोणत्याही पंतप्रधानांनी गैरकृत्य केले नव्हते. ते मोदींनी केले. असा घणाघाती आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते तथा काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांनी केला.

लोकमत न्यूज नेटवर्कअंबाजोगाई : गेल्या साडेचार वर्षात नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून आश्वासनांची खैरात सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राफेल घोटाळा आपल्या अंगलट येतो की काय असे वाटल्याने तो दडपण्यासाठी सीबीआय सारख्या महत्त्वपूर्ण संस्थेत पंतप्रधानांनी ढवळाढवळ करून सीबीआयच्या संचालकांना रात्रीतून सक्तीच्या रजेवर पाठवले. आजपर्यंतच्या कोणत्याही पंतप्रधानांनी गैरकृत्य केले नव्हते. ते मोदींनी केले. असा घणाघाती आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते तथा काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांनी केला.अंबाजोगाईत गुरुवारी काँग्रेस पक्षाची जनसंघर्ष यात्रेत ते बोलत होते. व्यासपीठावर प्रदेशाध्यक्ष खा. अशोकराव चव्हाण, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी खा. रजनीताई पाटील, माजी मंत्री सुरेश नवले, अशोकराव पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी, माजी आ. सिराज देशमुख, डॉ. नारायण मुंडे, टी. पी. मुंडे, नगराध्यक्षा रचना मोदी, केजचे नगराध्यक्ष आदित्य पाटील, जिल्हा परिषदेचे सभापती राजेसाहेब देशमुख, डॉ. अंजली घाडगे, संजय दौंड व पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी बोलताना खा. खरगे म्हणाले की, केंद्रात व राज्यात सत्ता असलेले भाजप जनतेची घोर फसवणूक करत आहे. जनतेवर सुरू असलेल्या अन्यायाच्या विरोधातच काँग्रसेने जनसंघर्ष यात्रा सुरू केली आहे. केंद्र व राज्यातील सरकार हटविण्यासाठी काँग्रेसला ताकद द्या. असे आवाहन त्यांनी केले. जनतेला भूलथापा मारून त्यांची घोर फसवणूक केली. मोदींच्या काळात देशाची मोठ्या प्रमाणात लूट सुरू आहे. ११ लाख कोटी रुपये नीरव मोदी, विजय मल्ल्या, मेहता व इतरांनी लुटून बँका उद््धवस्त केल्या. या आरोपींना सरकार काहीही करू शकले नाही. मोदी यांनी जनतेचा विश्वास गमावला आहे. त्यांच्या या सामाजिक गुलामगिरीला लोक वैतागले असल्याचे खरगे म्हणाले.चौकीदारच निघाला चोरमोदी हे स्वत:ला जनतेचा सेवक समजतात. सेवक म्हणून ही तुमची सेवा करत आहे. असे भासवून चौकीदारच खरा चोर निघाला अशीच त्यांची स्थिती झाली आहे. त्यांच्या विविध भूलथापांमुळे शेतकरी, व्यापारी, बेरोजगार देशोधडीला लागले आहेत. सेवकाचे ढोंग करणाऱ्या मोदींना त्यांची जागा दाखवून द्या अशा शब्दात खा. खरगे यांनी मोदींवर तोफ डागली.

टॅग्स :Beedबीडcongressकाँग्रेस