शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्रात भाजप कोणाच्याही कुबड्यांवर चालत नाही; सत्तेमुळे तुम्ही समाधानी असाल, पण मी नाही": शाह
2
तुमचे अधिकारी वृत्तपत्र वाचत नाहीत का? देशाची प्रतिमा मलिन होतेय; भटक्या कुत्र्यांवरून भडकले कोर्ट
3
१२ राज्यांमध्ये होणार मतदार याद्यांची पडताळणी; SIR दुसरा टप्पा ४ नोव्हेंबरपासून, महाराष्ट्राचा समावेश नाही
4
सरन्यायाधीश बूटफेक प्रकरण: वकिलावर कारवाई करणार नाही; सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्टीकरण
5
तातडीने सुनावणीस नकार, पण दोन मागण्या मान्य; मराठा-ओबीसी आरक्षण वादात ओबीसी संघटनेला कोर्टाचा दिलासा
6
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
7
शिवडीतील दागिने लुटीचा सुरक्षारक्षक निघाला सूत्रधार; एकाच घरात राहत होते सर्व आरोपी
8
राम जन्मभूमी मंदिराचे काम पूर्ण, २५ नोव्हेंबरला भव्य सोहळा, ६ ते ८ हजार निमंत्रित येणार
9
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
10
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
11
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
12
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
13
विद्यार्थ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी काय केले? तपशील सादर करण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश
14
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
15
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
16
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
17
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
18
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
19
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
20
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा

बीडमध्ये लोकसभाप्रमाणेच विधानसभातही जातीय राजकारण; मराठा-ओबीसी यांच्यात धुसफूस

By सोमनाथ खताळ | Updated: November 18, 2024 12:05 IST

प्रत्येकच उमेदवारांनी मतविभाजनाचा धसका घेतल्याचे दिसत आहे.

बीड : लोकसभा २०२४ च्या निवडणूकीत जिल्ह्यात जातीय राजकारण झाले. आता विधानसभा निवडणूकीतही पुन्हा तीच परिस्थिती पहायला मिळत आहे. उमेदवारांसह कार्यकर्ते हे मराठा-ओबीसी अशी गणीते जुळवून मतांचे राजकारण करत आहेत. सोशल मिडीयावरूनही सध्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असून वातावरण तापू लागले आहे. लोकसभेत मतदान प्रक्रियेनंतर मराठा-वंजारा असे वाद झाले होते. आता विधानसभानंतर याची पुनरावृत्ती होणार नाही, याची काळजी घेण्याचे आव्हान प्रशासन आणि लोकप्रतिनिधींसमोर असणार आहे.

जिल्ह्यात परळी, आष्टी, केज, माजलगाव, आष्टी आणि बीड असे सहा मतदार संघातून १३९ उमेदवार विधानसभा निवडणूक मैदानात आहेत. यामध्ये ८१ अपक्ष उमेदवार आहेत. लोकसभेला मराठा-ओबीसी अशी थेट लढत झाली होती. परंतू विधानसभेतील चित्र वेगळे आहे. प्रत्येक मतदार संघात, मराठा उमेदवार मैदानात आहेत. गेवराई मतदार संघात बदामराव पंडित, विजयसिंह पंडित, लक्ष्मण पवार हे प्रमुख उमेदवार मराठा आहेत. येथे प्रियंक खेडकर आणि मयुरी खेडकर ओबीसी म्हणून मैदानात आहेत. माजलगावात प्रकाश सोळंके, मोहन जगताप, रमेश आडसकर हे प्रमुख उमेदवार मराठा आहेत. माधव निर्मळ आणि बाबरी मुंडे हे ओबीसी म्हणून मैदानात आहेत. बीडमध्येही संदीप क्षीरसागर आणि डॉ.योगेश क्षीरसागर हे ओबीसी उमेदवार असून अनिल जगताप, कुंडलिक खांडे, डॉ.ज्योती मेटे हे मराठा उमेदवार मैदानात आहेत. आष्टीत सुरेश धस, बाळासाहेब आजबे हे मराठा असून भिमराव धोंडे ओबीसी तर महेबुब शेख अल्पसंख्यांक आहेत. परळीत धनंजय मुंडे आणि राजेसाहेब देशमुख यांच्यात लढत होत असून येथे थेट मराठा-ओबीसी लढत आहे. केज मतदार संघ राखीव आहे.

मतविभाजनाचा घेतला धसकाप्रत्येक मतदार संघात मराठा-ओबीसी उमेदवार आहेत. त्यांच्याकडून मराठा उमेदवारांकडून मराठा तर ओबीसींकडून ओबीसी मतांची गणीते जुळविली जात आहेत. प्रत्येकच उमेदवारांनी मतविभाजनाचा धसका घेतल्याचे दिसत आहे.

सभा, बैठकांमध्ये काढली जातेय जातसध्या उमेदवारांकडून माेठ्या नेत्यांच्या सभा घेतल्या जात आहेत. यामध्ये प्रत्येकजण आम्ही सर्व जाती-धर्माला सोबत घेऊन जात असल्याचे सांगत आहे. याच जातीच्या मुद्यावरून अनेक भाषणे गाजली आहेत. मोठ्या सभा सोडाच, पण साधी बैठक, गाठभेट दौऱ्यातही जातीचा विषय निघत आहे.

सोशल मिडीयावर वातावरण गरमलोकसभा मतदानानंतर सोशल मिडीयावर पोस्ट टाकल्यानेच केज तालुक्यातील नांदुरघाट येथे मराठा-वंजारा असा वाद झाला होता. याचे पडसाद राज्यभर उमटले होते. आता विधानसभातही सध्या तशीच परिस्थिती पहायला मिळत आहे. सोशल मिडीयावर मराठा-ओबीसी कार्यकर्त्यांकडून वादग्रस्त पोस्ट टाकल्या जात आहेत. यामुळे पुन्हा जिल्ह्यातील सलोख्याचे वातावरण बिघडू शकते. पोलिसांकडून नजर असल्याचा दावा केला जात असला तरी प्रत्यक्षात कारवाया केल्या जात नसल्याचे दिसत आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४marathwada regionमराठवाडा महाराष्ट्र विधानसभा निवडणूकbeed-acबीडmajalgaon-acमाजलगांवgeorai-acगेवराईashti-acआष्टीkaij-acकेज